
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, उमरखेड (ग्रामीण )
भाविक भाऊ भगत हेल्प फौंउडेशन ब्रिगेड यवतमाळ गाव मुक्काम पोस्ट पोहडुळ येथील महिला सौ. विमलाबाई दशरथ मस्के ही आजी काही महिने अगोदर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयत डोळ्याचा ऑपरेशन साठी गेली असता.तिचे ऑपरेशन करण्यात आले परंतु ऑपरेशन फेल झाल्यामुळे तिला दोन्ही डोळ्यानी काही दिसत नव्हते व डोळ्यामधून सतत गरम पाणी वाहत होते. तिला एके दिवसी कोणीतरी भाविक भाऊ भगत हेल्प फौंउडेशन मधील पदाधिकारी तुझी मदत करेल अशा विश्वास तिच्या मना. मध्ये ठासून भरला व ती भाविक भगत यांच्याकडे आली असता तिची सगळी व्यथा सांगीतली ती त्याची संपूर्ण व्यथात्यांनी ऐकून घेतली. आमचे हेल्प फौंउडेशन अध्यक्ष माननीय श्री. भाविक भाऊ भगत साहेबांना फोन केला असता. भाविक भाऊ भगत यानी सांगीतले की उदयाला शासकीय रुग्णालय. यवतमाळ येथे पाठवून दया. मी स्वता डॉ. सोबत चर्चा करतो जे काही मदत करता येते ती मी करतो असा शब्द दिला सांगीतल्या प्रमाणे भाऊंनी त्या आजीची शस्त्रक्रियाचे जे काही उपचार होते ते पुर्ण केले. आज त्या आजीला पुर्णपणे डोळ्यानी छान दिसत आहे आज यवतमाळ जिल्ह्यात व तसेच गावोगावी त्याची सन्मान पुर्वक सत्कार केला जात आहे व गावोगावी पण चांगलेच कौतुक होत आहे.
