
जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती व अनेकांचा मार्ग वेगवेगळा असतो असे नेहमीच आपल्याला आढळते. चांगले गुण आत्मसात करायचे असल्यास सहवास सुद्धा चांगले आचरण असणाऱ्याचेच असायला पाहिजे काय चूक किंवा काय वाईट याची जाणीव असणे सुद्धा जरुरी आहे. तसेच चुकीच्या कामाचे कर्मफळ हे भोगावेच लागते कोणाचे मन दुखावून व वाम मार्गाने पैसा प्राप्त केल्यास जीवनात नक्कीच दुःख वाटेला येईल ज्या क्षणी आपल्याजवळ शक्ती, संपत्ती, पैसा, असल्यास त्याचा वापर दुर्बलावर करून काय उपयोग असे सुद्धा संत तुकोबा म्हणतात
हे देवा धी देवा पांडुरंगा तूच माझा बहिण, बंधू ,चूलता, माता, पिता, असून हे रखुमाईच्या नाथा दीनानाथ मला आलेला आयुष्यातील थकवा घालण्यासाठी हे पंढरीचा राजा तू सदैव माझ्या चक्षुसमोर असावे मनुष्याच्या जीवनात देहनिष्ठा ईश्वरनिष्ठा महत्त्वाची मुख्य बाब आहे.आणि याची प्राप्ती करावयाची असल्यास पांडुरंगाचे पंढरीच्या विठुरायाचे मनोभावे नामस्मरण व भक्तियोग साधने द्वारे आयुष्यात फलश्रुती होऊ शकते. भक्ताचे संपूर्ण मानव रुपी देह भगवंताला अर्पित करणार हे ईश्वरा तुझ्या नामरुपी भक्ती सागरातील गोडवा काय असतो हे भक्ती करणारे अनुभवत आहे.
गळ्यामध्ये तुळशीमाळ व चंदनाची उटी असलेले निराकार सगुण व अतिशय मन प्रसन्न मुद्रा पंढरीच्या आलेल्या वारकऱ्यांच्या मनाला भुरळ घालत असून सदा सर्वदा नामजप केल्यामुळे अत्यंत भावभक्तीने अनेकांनी तुझे महत्त्व जाणले. तुझ्या दर्शनाने भक्ताचे जीवन तृप्त झाले असून विटेवर उभे असलेल्या विठुरायाचे भव्य दिव्य दर्शन जणू नयन चक्षु दिपविणारे असे गोजिरे व लाजिरवाणे आहे. या मन प्रसन्न करणाऱ्या व दुःखाचा नाश करणारे रूप पाहावेसे वाटणे काही गैर नाही. ते एक भक्तीचेच रूप आहे. विठ्ठलाची भक्ती करणाऱ्याच्या जीवनातील शेवटच्या श्वासापर्यंत सावळ्या गोजिरवाण्या विठुरायाची साथ होती म्हणूनच इथपर्यंत आल्यामुळे भक्ती करणाऱ्या भक्ताचे सर्व लक्ष तुझ्या भक्तीने वेधून घेतले आहे. याचाच परिपाक म्हणून व भक्तीचे कर्मफळ म्हणून भक्ती करणाऱ्यास सदा सर्वकाळ सुख प्राप्ती होत आहे. म्हणून हे विठुराया शेवटच्या श्वासापर्यंत तुझी अशीच आशीर्वाद रूपाने साथ राहू दे तसेच तनमन धनाने भक्ती करण्याचे प्राबल्य रुपी आशीर्वाद पाठीशी असू दे शिवाय तुझ्या नामजपाने व भावयुक्त भक्तीने माझ्या अंतर्मनातील भक्तीस तुझा पदस्पर्श कायम असू दे यातच माझे सर्व सर्वस्व सुख हीत सुखावले असून तुझे हे दिव्य स्वरूप नयना मध्ये साठवून राहावे हे देवा नाम भक्ती करीत असताना तुझ्या चरणाजवळ भक्तासाठी जागा ठेव शिवाय दुसरे काहीही नको
सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ति! रखुमाईचा पती सोयरीया!!
गोड तुझे रूप गोड तुझे नाम!
देई मज प्रेम सर्वकाळ!!
विठू माऊलीये हाची वर देई!
संचोरोनी राही हृदयामाजी!!
तुका म्हणे काही न मागे आणिक!
तुझे पायी सुख सर्व आहे!!(अ. क्र.१५)
माणूस म्हणून देह प्राप्त झाल्यानंतर जीवनात खरे सुख प्राप्ती व्हावे यासाठी संत सर्वांसाठी चूक बरोबर याची आठवण राहावी म्हणून मार्ग दाखवीत असतात. त्यांनी दाखविलेल्या सदमार्गावर चालणे किंवा न चालणे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते त्यांनी दाखविलेल्या मार्गावर जर आपण क्रमण केल्यास जीवनात पाहिजे तेवढे सुख प्राप्ती होईल आणि मोक्ष मुक्ती सुद्धा लाभेल फक्त एका अडचणीला सामोरे जावे लागेल ती म्हणजे अहंभाव, मद,मत्सर या बाबी सोडून असत्याला बगल देऊन वास्तवता सत्यता जपावी लागणार सध्याच्या युगात हा मार्ग कठीण व खडतर जरी असला तरी अल्पयुशी न राहता अनंतायुषी सुखाचा ठरणारा आहे. दुःख व पिडा यामुळे सुखाची किंमत कळते. वास्तविक तर संतांच्या आचरणात अंतकरणास सर्वच पृथ्वीतलावरील जलतरू पाषाणासह मातृ स्वरूपातील वासल्य आणि ममत्व हे कामधेनु स्वरूपातील गाई सारखे असते भक्ती शिवाय जगात काहीही उत्कृष्ट आणि श्रेष्ठ असू शकत नाही यातच खरा आनंद आहे जे सर्वांच्या नजरेस पडत नाही परमेश्वराची प्राप्ती करायची असल्यास नामस्मरण भक्ती याचीच गरज आहे नियमित मुखाने पांडुरंगाच्या नामस्मरणात प्रचंड अमाप शक्ती आहे अनेक बाबी जे अशक्य ते शक्य करण्याची अफाट क्षितिजासारखी शक्ती नामस्मरणात जपातपात असल्याचे महाराज सांगतात तर भूतलावरील माणसाला उपभोगाला आलेली पीडा दुःख शमविण्यासाठी संत गुरुस्थानी राहून संकटे दूर करण्याचा प्रयत्न करताना आढळतात. आपल्या जीवनातील आचरण व कर्मानुसार स्वतःचे जीवनाची किंमत ठरते म्हणून आचरण योग्य असले पाहिजे. उत्कृष्ट काम करा कोणावरही अन्याय व दांभिक पणा करून कोणाची संपत्ती बळकवू नका योग्य मार्गाने अर्थ प्राप्ती करा केवळ जीवनात पैसे कमवणे एवढेच ध्येय न ठेवता माणूस म्हणून कसे जगता येईल हे पण तेवढेच महत्त्वाचे.तसेच सानिध्यात जो कोणी सदगृहस्थ येईल त्यास योग्य मार्गदर्शन सल्ला द्या नक्कीच ईश्वराचे स्वरूप डोळ्यासमोर उभे ठाकेल कितीही धन दौलत कमवली तरी शेवटी संकटाच्या क्षणी कामाला येते ते केलेले उत्तम कर्म आणि आचरण व ईश्वराचे नामस्मरण माणसाच्या जीवनात सुखी व आनंदी राहण्यासाठी काय उपाय करायला पाहिजे आणि समाधान कशात आहे या बाबीच्या घटीकेचा सार समजावून सांगितला असून म्हणूनच संत शिरोमणी तुकोबा पंढरीच्या विठुरायाला नम्र होऊन विनम्रपणे आळवतात हे रुक्मिणीच्या नाथा दीनदुबळ्या भक्तांच्या दीनानाथा अनंतकाळ व शेवटच्या क्षणापर्यंत ईहलोकीचा निरोप घेईपर्यंत तुझेच ईश्वर रूप माझ्या चक्षुसमोर राहावे हे विठुराया दुसरे काहीही प्राप्तीची अपेक्षा नाही. सर्व बाबी कर्मावरच अवलंबून असतात तुकोबा यावेळेस आवर्जून सांगतात नक्कीच ज्यांनी आसूड पद्धतीने सत्तेचा उपयोग केला असल्यास या सर्व बाबींचा हिशोब कोणत्या ना कोणत्या स्वरूपात करावाच लागतो. हा निसर्गाचा अधोरेखित केलेला विधिलिखित नियमच आहे. तसेच स्वतःला पुढे जाण्यासाठी अनेकजण खटाटोप करीत आपले ध्येय साध्य करतात पण तो त्याचा स्वार्थ हेतू आणि आनंद जास्त काळ मुळीच टिकणारा नसतो केवळ क्षणिक व चमकणारा आनंद काही काळच असतो आपल्याला जे मिळवायचे आहे त्याची प्राप्ती केल्यास आपल्याला एक प्रकारे स्वर्गसुख मिळाले असे अनेक वेळा आपण अनेक ठिकाणच्या सार्वजनिक ठिकाणी झालेल्या कीर्तन सेवेतून व इतर माध्यमातून ऐकतो म्हणजेच त्या ठिकाणी आपली एकाग्रता तंतोतंत खरीखुरी असायला पाहिजे असे की परमेश्वर लाभासाठी केवळ दिखाऊ बाबीचा काहीही उपयोग होत नाही. ईशप्राप्तीसाठी मनोभावे अर्पण केलेला भक्ती भावच महत्त्वाचा दुवा ठरतो. माणसाला माणूस म्हणून जगता यावे म्हणून महात्मा बसवेश्वरांनी शुद्ध भावना मनात ठेवून प्रजेच्या व सर्व सामान्य लोकांसाठी नवीन जीवन पद्धती आखून देऊन सद विचारावर चालण्यास अनेक जणांना प्रवृत्त केले प्रसंगी अनेकांच्या विरोध झुगारून तसेच जे त्यांचे कल्याणकारी कार्य होते त्या हेतूने त्यांनी आपला अनुयायांना तसा परिपाठ शिकवला त्यामुळे संपूर्ण मानव जातीला एक जगण्याचा उत्तम उत्कृष्ट मार्ग मिळाला म्हणूनच सत्कर्माची इच्छा महत्त्वाची असते नुसते वरवरचे बोलण्यापेक्षा असणारी सदवृत्ती कृतीमध्ये उतरवणे महत्त्वाचे ठरते आणि तेच काम महात्मा बसवेश्वरांनी अवलंबिले.
!!जय जय रघुवीर समर्थ!!
निरूपण
प्रवीण रमेश जोशी
मु.पो. ढाणकी
ता.उमरखेड.जिल्हा.यवतमाळ
७३८५२६६१६६
