महिला बँकेत डिपॉजित केलेली रक्कम कुणी मिळवून देईल का ? राळेगांव येथील महिलेंची आर्त हाक

राळेगांव येथील रहवासी महिला धरती सुभाष पिसोळे या महिलेने आपल्या मुलींच्या उज्वल भविष्यासाठी पै,पै पैसा गोळा करून डिपॉजिट असलेला पैसा वेळेवर कामी येईल म्हणून धरती पिसोळे या महिलेने मोठ्या विश्वासाने बाबाजी दाते महिला बँकेत २५ एप्रिल २०१९ ला एक वर्षासाठी ८०,००० हजार ८.७५ % टक्के व्याजदराने डिपॉजित केले परंतु काही दिवसांपूर्वी बाबाजी दाते महिला सहकारी बँक यांचा २४२ कोटींचा अपहार उघडकीस आला आणि आणि गोरगरीब डिपॉजित करणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू बांध फुटायला सुरवात झाली अन बँकेतील असलेली डिपॉजित रक्कम कोणी मिळवून देईल का अशी म्हणण्याची वेळ राळेगांव येथील महिला धरती पिसोळे वर आली आहे.
सौ.धरती सुभाष पिसोळे ही यवतमाळ येथे पती सोबत राहायला गेली होती ते तिथे दोघेही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून रोजच्या कमाईतून डिपॉजित केले मात्र बाबाजी दाते महिला सहकारी बँक येथे २४२ कोटीचा झालेला अपहर उघड येऊन बराच कालावधी लोटला मात्र पाच लाखाच्या वरील ठेवी सभासदांना परत करण्याची ग्वाही दिली परंतु कष्टकरी श्रमिक महिला की ज्या रोज मजुरी करून ठेवी जमा करत होते त्यांच्या ठेवी आज गायत परत केलेल्या नाहीत याकरिता राळेगाव येथील धरती पिसोळी या महिलेने जमा केलेली ८० हजाराची ठेव केली ती व्याजासहित रक्कम एक लाख ९ हजार २८२ आज घडीला झाली असताना ही रक्कम माझ्यासाठी खूप मोठी असून ही रक्कम दाते महिला बँकेतून कोणीतरी मला मिळून देईल का यासाठी वन वन भटकत असून या जमा केलेल्या रक्कमे करिता ती आपल्या डोळ्यातून अश्रू गाळत आहे त्या स्वतःच्या काहीतरी बरे वाईट करून घेतील एवढा प्रचंड मनस्ताप त्या महिलांना होताना दिसत आहे तरी या बाबाजी दाते महिला बँकेतून आम्हा गरिबांच्या ठेवी कोणीतरी मिळून देईल का बँकेचे प्रशासकीय यंत्रणेतील असलेल्याना त्या गरीब महिलेची कीव येईल का असा प्रश्न सध्या या महिलेने केला आहे