
यासहसंपादक : रामभाऊ भोयर
वडकी – स्मॉल वंडर्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वडकीचा इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यंदाही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करत महाविद्यालयाची शान वाढवली आहे.
या निकालात सानिका श्रीकांत गावंडे हिने इंग्रजी विषयात सर्वाधिक 91 गुण मिळवून (80.67%) प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या खालोखाल समीरा अहमद शेख हिने इंग्रजी विषयात सर्वाधिक 91 गुण मिळवून (77%) दुसरा क्रमांक मिळवला, तर देव्यांनी मनोज महाजन हिने केमिस्ट्री या विषयात सर्वाधिक 85 गुण मिळवून (75.67%) तिसरा क्रमांक प्राप्त केला. तसेच पुनित प्रताप भंडारी (75.50%), मृणाली मोहन आत्राम (75%), निवेदिता प्रकाश चिव्हाणे (74.33%),पृथा दिनेश गावंडे (72.33%),दीक्षा विनोद दाते (70%), सना फिरोजखा पठाण (65.17%) ,दीक्षा राजेश निसार (68.50) या विद्यार्थ्यांनी चांगली टक्केवारी मिळवित यश संपादन केले आहे.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा दौ. सागर, तसेच शिक्षकवृंद विजय फुलकर , शंकर मालखेडे, वैभव करडे,अश्विनी तुराळे, चंदा गोबाडे व शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
स्मॉल वंडर्स कॉलेजचा यंदाही उत्कृष्ट निकाल ठरला असून वडकी परिसरामध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
