
प्रती/प्रवीण जोशी
ढाणकी………
दिनांक 22 रोज गुरुवारला ढाणकी येथील टेंभेश्वर नगर स्थित असलेले श्री दत्त मंदिर अत्यंत जाज्वल्य असून अख्ख्या पंचकोषित भक्ताच्या नवसाला पावणारे आहे. अशी भक्ताची श्रद्धा आहे, सततच्या पावसामुळे मंदिराच्या आजूबाजूला प्रचंड तणाचे प्रमाण झाले होते योग अभ्यास करणाऱ्या चमूने मंदिराच्या आजूबाजूला असणारी सर्व अनाठाई वाढलेली झाडे आणि झुडपे साफ करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला नक्कीच यातून योगाभ्यास केंद्रात येणारी नवीन जे युवक आहेत त्यांना यातून प्रेरणा मिळेल साफसफाई झाल्यानंतर योग अभ्यास केंद्रातील सर्व चमूने जेवण्याचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता केली व आमच्यातर्फे मंदिर आणि सामाजिक स्थळे साफसफाई करण्याची मोहीम अशी चालू राहील असे यावेळी उपस्थित असलेल्या सर्व योगाभ्यास केंद्रातील सदस्यांनी सांगितले.
