
वणी : स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये शाळा विज्ञान व कलाकृती प्रदर्शन कार्यक्रम पार पडला. आयोजित कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून संस्थाध्यक्ष मा. प्रदीपजी बोनगिरवर, अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मा. प्रवीण जी दुबे, विशेष अतिथी व्यवस्थापकीय संचालक मा. मोहनजी
बोनगिरवर ,प्रमुख पाहुणे ॲड. सूरज महारतळे व सुशगंगा पॉलिटेनिक च्या प्राचार्या श्रीमती पुष्पा राणी मॅडम आदि मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
पर्यावरणाची जाणीव करून देणाऱ्या व विज्ञानाचा प्रसार व्हावा अशा विषयांवर आधारित प्रकल्पांचा देखावा या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी साकारलेले पाहायला मिळाला आधुनिकतेची कास धरत अनेक विषयांची माहिती विद्यार्थ्यांबरोबरच जनसामान्यांना व्हावी यासाठी आकर्षक प्रकल्प या विज्ञान प्रदर्शनातं विद्यार्थ्यांनी साकारली होती. त्यामुळे हा विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनी विज्ञान प्रदर्शनात हजेरी लावली होती. विज्ञान प्रकल्प उभारलेल्या स्टॉलवर प्रत्येक विद्यार्थी अचूक अशी माहिती देत असल्याने
त्यांच्याकडे पालक वर्गाकडून कुतूहलाने बघण्यात येत होते. जागतिक उष्मिकरण, पर्यावरण, पृथ्वीवर मानवाला जिवंत ठेवण्याचे प्रकल्प, पाण्याची बचत विकसित शहरं वृक्षारोपण टाकाऊ पासून टिकाऊ,
विजेची बचत, पाणी बचत, अशा अनेक विषयांवर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांकडून बनविण्यात आले होते.
एकूण 110 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवित 68 प्रोजेक्ट प्रदर्शित केले.
दरम्यान ” पर्यावरण स्वरक्षण जागृती त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थांचे शालेय जीवनापासून विज्ञान व पर्यावरणा संबंधी नातेसंबंध वाढावे यासाठी अशा विज्ञानप्रदर्शनाची अत्यंत आवश्यकता असून ही काळाची गरज आहे ” असे उद्घटकीय भाषणातून प्रदीप जी
बोनगिरवर यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयता 10वी चे विद्यार्थी अमित यादव व वृतिका कोटीचा तसेच आभार प्रदर्शन विज्ञान शिक्षक तन्मय खेवले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर
कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
