
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
खैरी परिसरातील शेत शिवारातील खैरी वडकी विरूळ धानोरा रिठ या पांदन रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून येथील शेतकरी गेल्या कित्येक वर्षापासून पांदण रस्ता तयार होण्याची चातकासारखी वाट बघत आहे. मात्र त्यांना मानधन रस्ता तयार करून मिळत नाही आहे. परिणामी येथील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधीसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही लक्ष देण्याची मागणी खैरी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
खैरी वडकी खैरी विरू ळ खैरी धानोरा रिठ खैरी सावित्री पांदन रस्ता अद्यापही बनला नसल्याने येथील शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यांना शेतकामासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून शासन दरबारी पांदण रस्त्याचे निवेदन देऊनही शासन व प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. 2017 स*** पांदन रस्ता होणार असे प्रशासकीय स्तरावरून शेतकऱ्यांना सांगण्यात आले होते. परंतु मासी कुठे जिंकली हे एक न उलमगडणारे कोडे आहे. नंतर कोरोना काळा आला त्या काळात पांदन रस्त्यासाठी निधी नसल्याने पांदन रस्त्याचे काम झालेच नाही. मात्र गत दोन वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव नाही आहे व अर्थव्यवस्था बरी असतानाही निधी अभावी या पांदण रस्त्यांचे काम मात्र करण्यात आले नसल्याचा आरोप परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे.
खैरी परिसरातील शेतकऱ्यांनी मागील वर्षी जिल्हाधिकारी साहेबांना कार्यालयात जाऊन निवेदन दिले त्यावेळी निधी आला की रस्त्याचे काम करू असे त्यांनी आश्वासन दिले. परंतु अजूनही त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. यावर्षी अतिवृष्टीमुळे तर हे पांदण रस्ते भयंकर खराब झाले असून ह्या पांदन रस्त्यावर भरपूर खड्डे व चिखल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पांदण रस्ते खराब असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीची कामे मागे पडले असून शेतीची मशागत होत नसल्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र दिसत आहे. बंधन रस्त्यांनी जाताना बैल जोडी सोबत नेत असताना बैल हे चिखलात भरपूर फसत असून बैलासह शेतकऱ्यांना चालताना खूप त्रास होत आहे.
तरी शासन प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन आधीच अतिवृष्टीने जर झालेल्या शेतकऱ्यांना आता काढणीसाठी आलेले सोयाबीन पीक घरी आणण्यासाठी व कपाशी पिकांचे मशागतीचे काम करण्यासाठी पांदण रस्ते त्वरित तयार करून अथवा तात्पुरते दुरुस्त करून द्यावे अशी कळकळीची मागणी खैरी व परिसरातील शेतकऱ्याकडून होत आहे.
