मूलनिवासी विद्यार्थी संघ व पीपल्स पार्टी ऑफ इंडिया तर्फे महाराष्ट्र नवप्राध्यापक संघ व प्राध्यापक भरती लाभ्यार्थ आंदोलन तर्फे बेमुदत साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा

आज दिनांक 30/7/2021 रोजी मूलनिवासी विद्यार्थी संघ व पीपल्स पार्टी ऑफ इंडिया तर्फे महाराष्ट्र नवप्राध्यापक संघ व प्राध्यापक भरती लाभ्यार्थ आंदोलन तर्फे संविधान चौक ,नागपूर येथे सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला
जाहीर पाठिंबा देण्यात आला . त्याची प्रमुख मागणी -राज्यात 15000 सहाय्यक प्राध्यापक पदभरती वरील बंदी उठवून 100% जागा भरण्यात याव्यात. याकरिता बेमुदत साखळी उपोषणाला संघटनेचे कार्यकर्ता व नवं प्राध्यापक 15 दिवसापासून बसलेले आहे, त्या स्थळी जाऊन पीपीआय व मूलनिवासी विद्यार्थी संघातर्फे जाहीर समर्थन देऊन राज्यभरात आमच्या संघटनेच्या वतीने कलेक्टर मार्फत मुखमंत्र्याना या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पदभरती वरील बंदी उठवावी व लवकरात लवकर बॅकलॉग भरावा असे निवेदन देऊ अशी हमी पीपीआय चे नागपूर जिल्हा अध्यक्ष यांनी दिली तसेच राज्यभरात आंदोलनाचा इशारा सुद्धा याप्रसंगी देण्यात आला. नवंप्राध्यापक संघटनेच्या वतीने विद्यार्थी संघ व पीपीआय चे आभार मानण्यात आले.
याप्रसंगी पीपीआय चे जिल्हाध्यक्ष- समाधान रामटेके, शहर अध्यक्ष -तुषार मेश्राम विद्यार्थी संघाचे राज्य अध्यक्ष- ब्रिजेश खटाना , राज्य उपाध्यक्ष-सुरभी हिकरे ,गौरव सोनुने,चरणदास यादव रोहित पाटील,झिश्यान हुंमने,राहुल मडामे उपस्थित होते.