
.
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुका प्रतिनिधी
.
यवतमाळ नगर परिषदेसमोर गेल्या १९ दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन तसेच मागील पाच दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू होते अखेर आज यवतमाळ विधानसभेचे आमदार मदन येरावार यांनी आंदोलन मंडपाला भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या तात्काळ सोडविण्याचे अभिवचन दिले तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक दादाराव डोल्हारकर यांना बोलावून तसे आदेशही दिले.यामुळे गेल्या १९ दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची आज आ मदन येरावार यांच्या हस्ते आंदोलकांना शीतपेय पाजुन आंदोलन सोडण्यात आले.२४ एप्रिल २०२३ पासून शहरातील पर्यावरण प्रेमी- कार्यकर्ता राहुल दाभाडकर, शाम जोशी, सुकांत वंजारी, रमीज शेख यांनी शहरातील पर्यावरणीय प्रश्नाबाबत बेमुदत धरणे आंदोलन व नंतर सतत पाच दिवस अन्नत्याग आंदोलन सुरू होते.आंदोलन सुरू करण्यापुर्वी मुख्यमंत्री राज्य सरकार, जिल्हाधिकारी,यवतमाळ यांना मागण्या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार सुद्धा त्यांनी केलेला मात्र कुठलीही कार्यवाही होत नसल्याने त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले.१९ दिवस धरणे आंदोलन करूनही प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्यामुळे ८ मे पासून राहुल दाभाडकर यांनी अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले होते.यामध्ये प्रामुख्याने उपोषणकर्त्यांनी मांडलेल्या मागण्या रास्ता असून त्या लवकरच सोडविल्या जाईल असे आ. मदन येरावार यांनी सांगितले.संकट मोचन तलाव खोलीकरण व शुद्धीकरण करण,शहरातील विहिरी, नाले, तलाव कचरामुक्त करणे, जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबतची नियमावली कठोरपणे कार्यान्वित करणे,यवतमाळ शहरा लगत चौसाळा वनपरिक्षेत्राला लागून असलेले टाकळी, पिंपळगाव रोड व कॉटन मार्केट बायपास येथे यवतमाळ नगर परिषद तर्फे कचरा टाकला जातो. यापैकी टाकळी मध्ये सर्वात जास्त कचरा टाकला जातो. त्या डम्पिंग ग्राउंड ला संरक्षक भिंत उभी करणे किवा शून्य कचरा संकल्पना शहरात प्रत्यक्षात आणणे, शहरातील वृक्षतोडीबाबत असलेले कायदे प्रभावीपणे अमलात आणणे,पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ ची नगरपरिषदेने प्रभावीपणे अंमलबजावणी करणे,मानवीय व पशुवैद्यकीय जैविक औषधी कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबवणे,यवतमाळ शहरातील निर्माल्य व्यवस्थापन व निर्माल्य रथ पुन्हा सुरू करणे, शहरात जाळल्या जाणाऱ्या कचऱ्याबाबत प्रभावी जनजागृती व कायद्याची अंमलबजावणी करणे, नगरपरिषद सफाई कर्मचारी यांना पर्यावरणासंदर्भात प्रशिक्षण देणे,यवतमाळ शहरातील पशुवैद्यकीय दवाखाना दुर्लक्षित आणि सुविधेचा अभाव असणारा आहे त्यास करणे, पशुवैद्यकीय दवाखान्यातील संसर्गजन्य औषधी कचऱ्याचे व्यवस्थापन करणे.या मागण्या मान्य करीत मुख्याधिकारी तथा प्रशासक दादाराव डोल्हारकर यांना सूचना केल्या.यावेळी मदन येरावार यांचेसह मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर,
बेमुदत उपोषण सोडविण्याकरिता स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसह प्रामुख्याने माजी नगरसेवक नितीन गिरी,माजी नगरसेवक प्रा.डॉ.अमोल देशमुख यांनी समन्वयकाची भूमिका बजावली यावेळी उपोषण मंडपामध्ये उपोषण सोडते वेळी प्रा घनश्याम दरणे, संकल्प फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष प्रलय टिप्रमवार,नानाभाऊ गाडबैले,अभिजीत दाभाडकर,किशोर बाबुळकर आदी उपस्थित होते.
किशोर बाबुळकर आदी उपस्थित होते.
