
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील प्रगतिशील शेतकरी हरीश काळे यांची राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानार मास्टर ट्रेनर म्हणून निवड करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे खेड्या गावातील शेतकरी हरीश काळे यांनी बऱ्याच वर्षापासून सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली आहे यांनी सेंद्रिय शेतीपासून ऊस, केळी, हळद, तुर, गहू, जवस, राजमा तसेच उसाच्या रसापासून नॅचरल कुल्फी तर केळी पासून चिप्स व पाल्या भाज्या तयार करून स्वतःच्या शेतामध्ये विक्री साठी छोटेसे एक दुकान उभारून विक्री करत असल्याने या शेतकऱ्यांची शासनाने दखल घेत या शेतकऱ्यांना गुजरात राज्यातील नैसर्गिक शेती विज्ञान विद्यापीठ ता.हलोल जिल्हा पचंमहाल येथे १६ एप्रिल ते १९ एप्रिल पर्यंत प्रशिक्षण देण्यात आले असून सदर या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन यांची
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानात मास्टर ट्रेनर म्हणून निवड करण्यात आली आहे. सदर
केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी हरीश काळे यांची निवड करण्यात आली आहे . सदर हा शेतकरी आगामी काळात यवतमाळ जिल्ह्यामध्ये नैसर्गिक शेतीचे धडे देणार आहेत. तर
नैसर्गिक शेती अभियान चळवळ महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने जोर धरत आहे. नागरिकांना विषमुक्त अन्न मिळावे, जमिनीचा पोत सुधारावा, उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे, सेंद्रिय नैसगिक मालाला बाजारपेठ मिळावी आदी बाबी लक्षात घेऊन या अभियानाची अंमलबजावणी येत्या खरीप हंगामापासून सुरू होणार आहे. यासाठी सेंद्रीय शेती करणारे शेतकरी हरिश काळे यांची आता नैसर्गिक शेती मास्टर ट्रेनर म्हणून यवतमाळ जिल्ह्यासाठी निवड करण्यात आली आहे. तर हरीश काळे या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा बऱ्याच वर्षापासूनचा अनुभव असून आज ते जैविक पंजाबराव देशमुख जैविक मिशन, कृषक क्रांती, प्रभारी प्रोडूसर कंपनी झाडगावचे संचालक तसेच शेत बांधावर प्रयोगशाळा याचे सुद्धा ते संचालक असल्याने या शेतकऱ्यांना बराच अनुभव असल्याने त्यांची केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील साठी हरीश काळे या शेतकऱ्याची निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र शेतकरी मित्रांमध्ये कौतुक होत आहे.
