राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे धान्य मार्केटचे उद्घघाटन

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव येथे धान्य खरेदी करण्यासाठी मार्केटचे रीतसर उद्घघाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती इंजिनिअर अरविंद वाढोणकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सर्व प्रथम आपले धान्य घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा उपसभापती अरविंद वाढोणकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी शेतकऱ्यांला सर्वांधिक भाव4660 रूपये सोयाबीनचा भाव देण्यात आला.शेतकऱ्याला मालाचा योग्य दर मिळत असल्याने उपस्थित शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण दिसून आले.त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोविंदराव चहांदकर, गोवर्धन वाघमारे, राजेंद्र महाजन, सुधीर जवादे, अंकित कटारिया, तसेच राजू गांधी,सुरेश पेंद्राम,सुजित मेहता, एकनाथ भोयर यांच्या सह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुजित चल्लावार व मनोहर आडे सहाय्यक सचिव विनोद, झांबरे निरीक्षक निलेश तायडे पाटील, वरिष्ठ लिपिक साईनाथ ताटे लिपिक, घनश्याम वैद्य,दुधे कुबडे व इतर संस्थाचे पदाधिकारी, व्यापारी, शेतकरी उपस्थित होते.