
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दत्तकृपा बहुउद्देशीय संस्था वडकी व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय मोहित राजेंद्र
झोटिंग यांच्या आठव्या स्मृतिदिना प्रित्यर्थ भव्य मोफत रोगनिदान उपचार व रक्तदान शिबिर आज दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोज मंगळवारला सोनामाता हायस्कूल चहांद येथे संपन्न झाले.
सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र झोटिंग हे दरवर्षी स्वर्गीय मोहित याच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक जाणिवेतून सेवाभावी उपक्रम राबवित असतात. स्वर्गीय मोहित झोटिंग याचे आठ वर्षांपूर्वी “सिकल थेल”या आजाराने निधन झाले होते. आपल्या एकुलत्या एका मुलाचे देहदान करण्याचा निर्णय घेऊन नागपूर मेडिकल कॉलेजला त्याचा मृतदेह राजेंद्र झोटिंग यांनी सुपूर्द केला होता हे विशेष. या आरोग्य शिबिराला उद्घाटक म्हणून वरोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार करणराव देवतळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चित्तरंजन दादा कोल्हे, तर प्रमुख पाहुणे म्हणून वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे, माजी पंचायत समिती सभापती प्रवीण कोकाटे, सरपंच रूपाली राऊत, वरोरा पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद् लडके, विजयराव मोकाशी, रमेशराव झोटिंग मुख्याध्यापक अनिल धोबे, निखिल शेळके, चारुदत्त पाटील,राहुल पाटील , प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते. सर्वप्रथम स्वर्गीय मोहितच्या प्रतिमेचे पुजन करुन दिपप्रज्वलन करुन आमदार करण देवतळे यांनी, शिबिराचे ऊद्घाटन केले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व मार्गदर्शन संपन्न झाले. यावेळी आमदार यांनी आपल्या भाषणात रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे असे सागितले यावेळी यावेळी चित्तरजनदादा कोल्हे,प्रविण कोकाटे, ठाणेदार भोरकडे यानी मार्गदर्शन केले आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रुग्णांचे निदान व उपचार करण्यात आले. यावेळी १८ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर पंकज टापरे यांनी केले सदर रोगनिदान शिबिराला यशस्वी करण्यासाठी सोनामाता हायस्कूलचे शिक्षक प्रकाश चिव्हाने, अतुल दांडेकर,भास्कर पाटील, शंकर जोगी, दिलीप बांगरे, डॉक्टर राजश्री टापरे, प्रशांतअहिरकर, प्रदीप झोटिंग, राकेश कारमोरे सुनील मेश्राम अतुल मुळे, देवानंद सोनोने, प्रथमेश राऊत व दत्तकृपा बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन श्र सतिश सावंत तर आभार प्रदर्शन गावंडे मॅडम यांनी केले.
