
श्री राम नवमी उत्सव निमित्ताच्या पार्श्वभूमिवर विविध कार्यक्रमाचे आयोजन
दरवर्षी प्रमाणे यंदाही अनेक वर्षाच्या परंपरेतून भव्य दिव्य मिरवणुकीसह विविध स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करण्यात आल्या होत्या;
प्रभू श्री राम यांच्या संस्काराबद्दल सर्वांना माहिती मिळावी व त्यांचे संस्कार प्रत्येकांनी आपल्या जीवनात उतरवावे करिता लहान मुलांन करिता भव्य चित्रकला स्पर्धा चे आयोजन,तसेच ‘श्री राम चरित्र प्रश्नावली’ प्रश्न मंजुषा स्पर्धेचे, रांगोळी स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रभु श्रीराम यांच्या जीवनावर आधारीत चित्ररथ, दिंडीयात्रा, भजनी मंडळी, विविध संगीत वादक आणि रामनवमी च्या दिवशी दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी शहरातील क्रांती चौक येथे महाआरती आणि बाईक रॅली ची सुरूवात, सायंकाळी भव्यदिव्य शोभा यात्रा, पालखी पुजन करून श्रीराम मंदिर येथून सुरूवात करण्यात आली यावेळी स्वागत समितीचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा डॉ. प्रा. अशोक उईके सर, तहसीलदार भोईटे साहेब, ठाणेदार मेहत्रे साहेब, नगराध्यक्ष रवींद्रजी शेराम, उपनगराध्यक्ष जानरावजी गिरी, डॉ कुणालजी भोयर, भूपेंद्रजी कारीया, अंकुश जी रामगडे, अनिलजी वर्मा, मेघश्यामजी चांदे, अध्यक्ष गोपालजी मशरू, सुरेश जी गहरवाल, राजेशजी शर्मा, संदीप पेंदोर , सौ. खनगण ताई, सौ. संतोषीताई वर्मा, मातृशक्ती तर्फे सौ. पूनमताई क्षीरसागर, सौ. दीपालीताई महाजन, सौ. स्वातीताई निंबुळकर,सौ. अर्चनाताई क्षीरसागर, सौ. मंगलाताई धोटे, दुर्गवाहिनी तर्फे कु. प्राची देशमाथुरे व सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना तथा समस्त हिंदुत्ववादी संघटना, श्री राम नवमी उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थती होते, भव्य दिव्य स्वरुपात कार्यक्रम पार पडला, प्रत्येक चौकात सजावट, झेंडे तोरण, बैनर, तसेच पाणी, शरबत, फ्रुटी, नास्ता विविध नियोजन करण्यात आले होते,
या संपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्रीरामनवमी शोभायात्रा उत्सव समिती, राळेगांव चे वतीने केले, श्रीराम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष अॅड. प्रितेश वर्मा यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
