
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे व गावातील तंटा गावातच समोपचाराने मिटावे या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने सन २००७ पासून सुरु केली.सोमवारी 19 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत जळका येथे ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेमध्ये विविध विषय घेण्यात आले.
ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीचा विषय हा प्रामुख्याने घेण्यात आला. त्यात तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीसाठी, गावातील नागरिकांनी ग्रामसभेसाठी चांगलीच गर्दी केली होती. तंटामुक्त समिती अध्यक्ष पदासाठी 2 उमेदवारांनी अर्ज केला. परंतु गावातील जनतेचा कौल माजी सैनिक श्री.शंकर सायशे यांच्या बाजूंनी लागला. आणि त्यांची बहुमताने तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. शंकर सायशे यांनी मागील कारकिर्दीत भारतीय सेने मध्ये सेवा केली, त्यामुळे नागरिकांनी भारतीय सीमेवर सेवा देणाऱ्या सैनिकाला संधी दिली.यावेळी ग्रामपंचायत कार्यालया मध्ये ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच तथा सदस्य उपस्थित होते, निलेश हिवरकर,अशोक येडस्कर, सुरेश महाजन,दीपक भडे,गणेश आडे,दत्ता सा,दिनेश पोटे,प्रसाद पाल, कमलदास तिरनकर, अनिल वनकर,लक्ष्मण सायशे,सुरेश महाजन आदींनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
