बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गावात 55 मंडळांनी गणेशाला केले विराजमान ,पोलीस चौकीतील पोलीस वर्दीतील गणेश मूर्ती नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र


प्रतिनिधी :ढाणकी प्रवीण जोशी


बिटररगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील ग्रामीण भागात 39 गावात गणरायाचे स्वागत करून स्थापना करण्यात आली तर ढाणकी शहरात 16 सार्वजनिक मंडळांनी गणेश मूर्ती स्थापना केली एक गाव एक गणपती हि संकल्पना राबवत आदर्श म्हणून 7 गावामध्ये प्रत्येकी एकच गणपती मूर्ती स्थापन करण्यात आली.
दोन वर्षा पासून कोरोना रोगाच्या सावटा मूळे सण उसव साजरे करता येत नव्हते यावर्षी शासनाने नियमात शिथिलता दिल्याने मोठ्या उत्सहात गणेश भक्तांनी सहभाग घेत ढोल ताश्याच्या गजरात डीजेच्या मधुर आवाजात गणेशाचे स्वागत करून स्थापना केली
ढाणकी शहरातील ढाणकीचा राजा म्हणून ओळख असलेल्या हिंदवी गणेश मंडळाच्या सदस्य नगरसेवक बाळाभाऊ योगेवार नगरसेवक पंकज केशेवाड नगरसेवक साई मंतेवाड यासह मंडळातील इतर सहकारी सदस्यांनी मिळून गणरायाचे स्वागत करण्या करीता गणरायावर गुलाल फुलांची वृष्टी करण्या करीता जेसिबी तुन करण्यात आली.
गणराया चे स्वागत मिरवणूक पाहण्या करीता आबाल वृद्ध लहान मूल महिला मंडळी रस्त्यावर दिसून येत होत्या.
गणरायाच्या आगमन मिरवणुकी मध्ये कोणतेही विघ्न नको म्हणून बिटरगाव पोलीस स्टेशन जबाबदारी पारपाडत होती.
पोलीस दादानेही आपल्याला गणेश भक्ती करण्याची संधी मिळावी म्हणून ढाणकी पोलीस चौकी मध्ये पोलीस गणवेशातील गणरायाची मूर्ती स्थापन केली त्यामुळे शहरात चर्चेचा विषय होत आहे
.