
सहसंपादक : रामभाऊ भोयर
सावनेर येथील शेतकरी, स्वप्निल विनायक आत्राम, वय ३८ वर्ष हे दिं २७ जून २०२३ च्या सायंकाळी सात वाजता च्या सुमारास बाथरूम मध्ये लघुवंशंकेला गेले असता बाथरूमला असलेल्या लोखंडी दरवाजाला विद्युत प्रवाह असल्याने त्याला जबर विद्युत शॉक लागून खाली पडल्याची घटना घडली आहे.
स्वप्नील हा जेवण करून बाथरूम मध्ये गेला असता बाथरूम मधील असलेल्या लोखंडी दरवाजाला विद्युत प्रवाह असल्याने स्वप्नीलने दरवाजा उघडला असता विद्युत शॉक लागून स्वप्नील खाली पडला तेव्हा स्वप्नील खाली पडल्याचे लक्षात येताच घरच्यांनी स्वप्नीलला लगेच ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरानी स्वप्नीलला हा मृत्यू पावल्याचे घोषित केले असून स्वप्नीलच्या मागे पत्नी, एक मुलगा,आई, वडील असा मोठा आप्त परिवार आहे.स्वप्नील हा मनमिळावू व संयमी स्वभावाचा असल्याने स्वप्नीलच्या मृत्यूने सावनेर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
