
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
२०२६ चा मानाचा ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला असून, नुकताच हा सोहळा पुण्यात संपन्न झाला. स्वराज्य फिल्मचे राष्ट्रीय सचिव सूरज सुधाकरराव पवार यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे.
मा.राज उल्हासराव कोरले यांचा कलाप्रवास कला वाणिज्य महाविद्यालय राळेगाव (राष्ट्रीय सेवा योजना) येथून सुरू झाला अनेक कठीण प्रसंगांवर मात करत त्यांनी अभिनयाचा छंद जोपासला नाटिकेत त्यांच्या मुख्य भूमिकेने त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात व गावात पोहोचवले आणि प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासात आता त्यांच्या या कष्टाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.
हा गौरव सोहळा १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड, पुणे येथे पार पडला. कला क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या हस्ते राज उल्हासराव कोरले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त मा.मारुती जगताप यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी व्यासपीठावर चित्रपट निर्मात बाळासाहेब बांगर, बाळासाहेब बोराटे, दिग्दर्शक काळूराम ढोबळे, सागर ननावरे तसेच प्रसिद्ध कलाकार सुनील नाना गोडबोले, विजय पाटकर, प्रशांत तपस्वी, भूषण कडू,
अनिल नगरकर, मृणालीनी कुळकर्णी, कु. काजल शिंदे, नितीन भवरे, सचिन भवरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.नाव : मा. राज उल्हासराव कोरले आपण सतत काम करत असलेल्या कला क्षेत्रात नेहमी चांगली कामगिरी करत असतात आणि आपल्या अभिनयाच्या माध्यमातुन समाजाला नेहमी चांगला संदेश देत असतात. या कार्याची दखल घेऊन संस्थेने आपल्याला कलावंत दादा साहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.यामुळे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
