
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतकऱ्यांना परवडणारे एकमेव रासायनिक खत असलेल्या युरियावर आता लिकिंग सुरू केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. युरिया हवा तर दोनशे रुपये किमतीचे लिक्विड खते घेण्याचा आग्रह विक्रेते करून लागले आहेत. कृषी विभागाची तालुकानिहाय भरारी पथके आहेत, मग ही पथके करतात तरी काय, असा प्रश्न शेतकरी करू लागले आहेत. रासायनिक खतांच्या किमती आवाक्याच्या बाहेर गेल्याने शेतकरी अडचणीत आहे. केंद्र सरकारने रासायनिक खतांवरील अनुदान कमी केल्याने दर वाढले आहेत. युरिया हे एकमेव खत शेतकऱ्यांच्या आवाक्यात राहिले आहे. युरिया २६६ रुपये विक्री दर आहे; पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात कोठे २७० तर कोठे २७५ रुपयांना पडतो.
मात्र, यातही सध्या राळेगाव तालुक्यात युरियावर लिकिंग दिले जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. विशेष म्हणजे खासगी विक्रेत्यांसह दुकानातही शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. २६६ रुपयांचा युरिया हवा लू असेल तर किमान दोनशे रुपयांची लिक्विड खत घेण्याची सक्ती विक्रेते शेतकऱ्यांना करू लागले आहेत.
प्रतिक्रिया
महापुराने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना आता खतविक्रेतेही वेठीस धरू लागले आहेत. युरियाच्या दराएवढेच लिकिंग शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. याचबरोबर 266 यूरिया हा साडेतीनशे रुपये पर्यंत घ्यावा लागत आहे. हा प्रकार घडत असताना कृषी विभाग नुसता बघ्याची भूमिका घेत आहे. स्वतः मला युरिया घेण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना अनेकदा फोन करावा लागला.

युवा शेतकरी – स्वप्नील वटाणे
