
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव च्या आवारात दरवर्षी प्रमाणे यंदाही नाफेड अंतर्गत आज दिनांक 15/11/2025 रोजी खरेदी विक्री संघाचे संचालक पवन छोरिया यांच्या हस्ते काटा पुजन करून सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.त्यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक श्रीधर थुटुरकर ,कवडूजी कांबळे, सचिव संजय जुमडे कर्मचारी गणेश हिवरकर तसेच हमाल,मापारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.येत्या सोमवारपासून नोंदणी प्रमाणे सोयाबीन खरेदी सुरू केली जाणार असल्याची शेतकरी बंधूंनी नोंद घ्यावी असे आवाहन खरेदी विक्री संघाकडून करण्यात आले आहे.
