राळेगाव येथे कलावंत मार्गदर्शन सभा संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर

अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती शाखा राळेगावचे वतीने दिनांक 11/.1/.2025 रोज शनिवारला दुपारी अकरा वाजता ग्रामीण विकास प्रकल्प मातानगर राळेगाव येथे श्री अविनाश बनसोड जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय कला न्याय हक्क समिती यवतमाळ यांचे अध्यक्षतेखाली श्री रमेश वाघमारे जिल्हा सचिव अ भा क न्याय हक्क समिती यवतमाळ यांचे शुभहस्ते उद्घाटन पर श्री गुणवंतराव लडके जिल्हा उपाध्यक्ष अ भा क न्याय हक्क समिती श्री अशोक उमरतकर जिल्हा संघटक श्री दिगंबरराव गाडगे तालुका सेवा अधिकारी गुसेम कळम श्री गणेश भाऊ फटिंग तालुका सेवा अधिकारी गुसेम राळेगाव श्री अरुण भाऊ खंगार तालुका प्रचारक गु से म राळेगाव सीमाताई अष्टकार तालुका सेवा अधिकारी महिला गुसेम राळेगाव हरिभक्त परायण गजानन सुरकार श्री कृष्णराव राऊळकर जेष्ठ कार्यकर्ते गुसेम श्री मधुकरराव गेडाम अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघटना रालेगाव श्री गंगाधर घोटेकर तालुका अध्यक्ष अ भा क न्याय हक्क समिती शाखा राळेगाव श्री वातीले साहेब श्री कटकजवार साहेब घाटंजी श्रीराजूभाऊ सिडाम मारेगाव व मालेगाव राळेगाव कळम घाटंजी तालुक्यातील अनेक कलावंत यांचे उपस्थितीत कलावंत मार्गदर्शन सभा संपन्न . राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे प्रतिमेचे पूजन मालारपण दीप प्रज्वलन मान्यवरांचे शुभहस्ते मान्यवरांचा सन्मान खंजिरी भजन अखिल भारतीय कलावंता न्याय हक्क समिती शाखा राळेगाव यामध्ये नोंदणी केलेल्या 280 कलावंतांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन सन्मान. व कार्यक्रम प्रसंगी 110 कलावंतांची नव्याने नोंदणी. राळेगाव शहरात तालुकास्तरीय कलावंत मेळावा घेण्याबाबत चर्चा, त्याचप्रमाणे इतर तालुक्यात नोंदणी व मेळावे घेण्याबाबत नियोजन सुरू असल्याबाबत व अखिल भारतीय न्याय हक्क समितीचे कार्य कलावंत संघटन काळाची गरज व योजनेबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले .सभेला 500 कलावंतांची उपस्थिती व त्यामध्ये महिला कलावंतांची उपस्थिती अग्रगण्य होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रमोद वतारी प्रास्ताविक श्री सय्यद युसुफ अली व आभार प्रदर्शन श्री ह भ प गजानन महाराज सुरकर अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती शाखा राळेगाव यांनी केले.