सावंगी येथे विजेच्या धक्क्याने बैल मृत्युमुखी    


राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

खैरी येथून जवळच असलेल्या मारेगाव तालुक्यातील
 सावंगी येथील मधुकर तानबाजी बोबडे यांचा बैल विज पडून मृत्यू पावला.
       दिनांक सात सप्टेंबर रोज बुधवार ला दुपारी साडेबारा ते एक वाजताचे दरम्यान अचानक मेघ गर्जनेसह आलेल्या पावसाने मधुकर बोबडेनामक शेतकऱ्यांने विजेचा कडकडाट पाहून आपल्या बैलजोडीसह घराकडे प्रयाण केले व बैल बांधून विजेचा कडकडाट पाहून सदर शेतकरी घरामध्ये गेला असता अचानक पडलेल्या विजेणे त्यांचा  एक बैल जागीच ठार झाला. शेती हंगामात बैल मृत्यूमुखी पडल्याने सदर शेतकऱ्यावर आपत्ती कोसळली.