
आदिवासी समाजातील विध्यार्थानी आपली कलासंस्कृती जपतच शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे : वसंत पुरके माजी शिक्षणमंत्री म.रा.
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
दिनांक १४-१-२४ रोजी राळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथे क्रांतीवीर श्यामादादा कोलाम जयंती उत्सव समिती, सावरखेडा व्दारा आयोजित सामाजिक प्रबोधन मेळावा व विदर्भस्तरीय भव्य चौताली दंडार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . या सुवर्णमय सोहळ्याचे उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष अँड.प्रफुल मानकर अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी यवतमाळ,तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, तर उद्घाटक वसंत पुरके माजी शिक्षणमंत्री म.रा, प्रमुख वक्ते प्रशात गावंडे सर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद वाढोणकर उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव,लेतुजी जुनगरे माजी जि.प.सदस्य तथा माजी सभापती पं.स.राळेगाव, प्रविण कोकाटे माजी सभापती पं.स.राळेगाव, अरविंद फुटाणे माजी अध्यक्ष राळेगाव काँग्रेस कमिटी, राजेंद्र तेलंगे अध्यक्ष काँग्रेस कमिटी राळेगाव,अशोकराव केवटे माजी सभापती पं.स.राळेगाव , डॉ नरेंद्र इंगोले माजी सरपंच वडकी,तथा माजी अध्यक्ष वसंत जिनिंग राळेगाव,अंकूश मुनेश्वर संचालक कृ.उ.बा.स.राळेगाव, रणजित कोरडे सामाजिक कार्यकर्ते लोणी,रआजउभआऊ मेश्राम सरपंच सावरखेडा,कपिल चौधरी उपसरपंच सावरखेडा, निलेश रोठे सरपंच वरध,वनिश घोसले सरपंच पळसकुंड, संतोष आत्राम सरपंच सराटी धनंजय पुरके सरपंच सखी, गंगाराम आत्राम सरपंच देवधरी, विमलताई देवनाळे सरपंच्या भिमसेनपुर,अरुन खंडारे उपसरपंच विहिरगाव, गजानन ढाले सामाजिक कार्यकर्ते खैरगाव, वैकुंठ मांडेकर चाचोरा सामाजिक कार्यकर्ते, प्रकाश पोपट माजी उपसरपंच वाढोणा बाजार तथा सामाजिक कार्यकर्ते,विजय कुटे सामाजिक कार्यकर्ते ऐकुर्ली, श्रीमती लीलाताई शिलेकर सदस्या ग्रा.पं.आठमुर्डी, भिमराव बोटोणे सरपंच चिखलदरा, पुरुषोत्तम चिडे वाढोणा बाजार सामाजिक कार्यकर्ते, वैभव इंगोले युवा काँग्रेस कार्यकर्ते वडकी, विनोद माहुरे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी, वासुदेव कोंडेकार अध्यक्ष यवतमाळ तालुका काँग्रेस कमिटी, आदिवासी सेल, रामदास मानगी माजी सरपंच किंन्ही जवादे,व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न.यावेळी प्रमुख वक्ते प्रशात गावंडे यांनी शिक्षण घेण्याकरिता कोणत्याही कारणांची गरज नसते फक्त आपल्याला शिक्षण घेऊन मोठ्या पदावर काम करण्याची इच्छाशक्ती पाहिजे.ज्या मुलांना हातपाय नाही दिव्यांग आहे अशी पण विध्यार्थी आज मुख्यसचिव पदापर्यंत पोहचु शकते मग आपण का नाही , यावेळी विद्यार्थ्यांसोबतच आईवडील पण तेवढेच विध्यार्थाना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात दोषी आहे असे त्यांच्या मनोगतात सांगितले,तर वसंत पुरके सर यांनी आदिवासी समाजातील विध्यार्थानी आपली कलासंस्कृती ही तर जपायची आहे पण शिक्षणाकडे विषेश लक्ष दिले पाहिजे , कुठल्याही आदिवासी विद्यार्थ्यांनी व्यसनांच्या आहारी जाऊ नये . आजकाल व्यसन लाऊन त्याच्या फायदा घेणारे खुप आहे त्यांनी सांगितले की मलातरी माझ्या मामानेच दारुचे व्यसन लावण्याचे प्रयत्न केले होते पण मला कळले की व्यसन चांगले नाही म्हणुन मी म.रा.शिक्षणमंत्री होऊ शकलो, आपले केंद्र सरकार,व राज्यसरकाचा ,जि.प.शाळा मोडकळीस आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते ते आजच्या युवापिढीला शिक्षणाऐवजी मंदिराकडे नेण्यासाठी प्रयत्न करीत आहे . देवाच्या नावाखाली मतांचा जोगवा मागण्यांचे काम केंद्र व राज्य सरकार करीत आहे तेव्हा आदिवासी समाजातील विध्यार्थानी मंदिराकडे न जाता शिक्षणाकडे लक्ष देऊन मोठ्या पदावर गेले पाहिजे असे मार्गदर्शन केले.यावेळी आदिवासी समाजातील बांधवांनी आपल्या विविध संस्कृतीचे जतन करीत आदिवासी नृत्य सादर केले यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव व इतर समाजातील महिला, पुरुष उपस्थित होते. आयोजित समितीचे सुरेश जुनगरे अध्यक्ष,मुकेश आत्राम उपाध्यक्ष, सुधाकर मेश्राम सचिव,कवडु आत्राम कोषाध्यक्ष,किरण टेकाम सहसचिव ,प्रशात कीनाके सहकोषाध्यक्ष, प्रशांत परचाके सल्लागार, अरविंद जुमनाके व्यवस्थापक, निलेश आत्राम संघटक, रामचंद्र टेकाम प्रसिद्धीप्रमुख,या आयोजक समितीने कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.
