आनंदाच्या शिधा नाही तर ही शेतकऱ्यांची थट्टा…!वंचितचे दिलीप भोयर यांची सरकारवर टीका

भालर :- अतिवृष्टीच्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दीपोत्सवात त्यांच्या हक्काची आर्थिक मदत बँकेच्या पेचात अडकवली. तर शंभर रुपयात एक एक किलो रवा, साखर, तेल, चनादाल हे साहित्य आनंदाची शिधा म्हणून दिल्या जात आहे. ही आनंदाची शिधा नसून शेतकऱ्यांच्या दुःखी अंतरमनाची चक्क थट्टा असल्याचा आरोप वंचितचे दिलीप भोयर यांनी केला आहे.

तुटपुंज्या शिधेने मंत्रायलातील कोणत्या मंत्र्यांच्या घरी अशा चार किलो साहित्यात या अगोदर दिपावली साजरी केली होती, असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष तथा श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर यांनी उपस्थित केला आहे.

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे उभे पीक खरडून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिरव्यागार शेतात काळोख पसरला आहे. महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून त्यांच्या पिकविम्याचे संरक्षण देण्या ऐवजी सरकार कंपनीच्या भल्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्यात नकार देत आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणून थातुरमातुर हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये देऊन त्यांच्या जखमेवर मीठ लावत आहे.

शेतकऱ्यांचे एकदा दोनदा शेती खरडून गेली नाही तर तब्बल तीन ते चारदा शेती उध्वस्त झाली आहे. त्यातच परतीच्या पावसाने उरल्या सुरल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन, कपाशीचे ही अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतमजुरांच्याही हाताला काम उरले नाही. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या तुलनेत केवळ १० % भरपाई सरकार कडून मिळत नसल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. अश्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा सरसकट लाभ न देता केवळ शंभर रुपयात आनंदाचा शिधा राशन दुकानातून वाटप करून त्यांच्या हक्काच्या मागणीवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा शिधा मध्ये आणला आहे.

हा आनंदाचा शिधा नसून त्यांच्या दुःखी अंतरमनाची ही घोर थट्टा उडविण्याचा प्रकार आहे. सरकारला हा शिधा वाटप करण्यासाठी सुट्टीतही राशनचे दुकान चालू ठेवण्यात आले तर मग बँकेत जी तुटपुंजी मदत जमा केली आहे ती उचल करण्यासाठी बँका का चालू ठेवल्या नाही असा सवाल वंचितचे विधानसभा दिलीप भोयर यांनी सरकारवर टीका करत उपस्थित केला आहे.

चार किलो साहित्यात खरच दिपावली साजरी होईल का ?

.सरकाने राशन दुकानामार्फत एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चनादाळ, एक किलो तेलाच्या पॅकेट मध्ये गोरगरिबांनी दिपावली गोड करण्यासाठी आनंदाचा शिधा म्हणून मोठ्या जाहिरातीने वाटप करण्यात येत आहे. ज्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मतांवर डल्ला मारून सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांच्या व त्यांच्या आमदारांच्या घरी या अगोदर अश्या चार किलो साहित्यात दिपावली साजरी केली होती का ? असा त्यांनी पुरावा सादर करून दाखवाव नंतर अशा आनंदाचा शिधा म्हणून जाहिराती कराव्यात असा सल्ला देत दिलीप भोयर यांनी कडवी टीका सरकारवर केली आहे.