
प्रतिनिधी//शेख रमजान
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या विदर्भ विभागीय कार्यकारी अध्यक्षपदी येथील राजकीय व सामाजिक कार्यात सक्रिय असलेले संजय पळसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
अ . भा .भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सेनानी प्रदीप पाटील खंडापूरकर ( बाबा ) यांच्या मार्गदर्शनात समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल दादा देसले यांनी संजय पळसकर यांच्यावर विदर्भ विभागीय कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे .समितीने सोपविलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडून भ्रष्टाचार मुक्त समाज घडविण्यासाठी अ . भा . भ्रष्ट्राचार निर्मुलन संघर्ष समितीच्या माध्यमातून कार्य करूअशी ग्वाही नवनियुक्त विदर्भ विभागीय अध्यक्ष संजय पळसकर यांनी दिली .
