
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचे वारे जोमाने वाहत असतांना ठीक ठीकानी मतदान झाले. याला अनुसरूनच उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातील ढाणकी शहरात व परिसरातील आजूबाजूच्या गाव खेड्यामध्ये मतदान केंद्रावर वयोवृद्ध व्यक्ती, नवमतदार असलेल्या युवक युवतीचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. सोशल मीडिया मार्फत गेल्या अनेक दिवसांपासून मतदारांना मतदानाविषयी जनजागृतीचे महत्त्व आणि तत्संम संदेश सुद्धा यावेळी फिरत होते
ढाणकी शहरातील एकूण १४बूथ असून मतदान केंद्रावर अगदी ठरलेल्या वेळेनुसार २० नोव्हेंबर बुधवारला बजावला सरासरी ६७::९० टक्के मतदान झाले व तब्बल निवडणुकीमध्ये १७ उमेदवाराचे भविष्य मतपेटीत बंद झाले. विजय उमेदवार कोणता ही घोषणा येत्या २३ नोव्हेंबर शनिवार रोजी होणार असून नेमका कोण्या पक्षाचा उमेदवार किती मतदानाच्या फरकाने निवडून येणार याकडे संपूर्ण उमरखेड महागाव विधानसभा मतदार संघाचे लक्ष लागले आहे .वयोवृद्ध व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी तरुणांची फळी सगळीकडे दिमतीला होती यावेळी मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा तैनात होता बिटरगाव(बू) पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष मनवर यांनी मतदान या महत्त्वाच्या प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता. मतदान होणार असल्याकारणाने जवळपास सर्वच कार्यालयाला सुट्टी होती. रस्त्यावर वाहनांची संख्या तुरळक असल्याकारणाने वाहने मोजकीच दिसत होती. त्यामुळे अनेक मतदात्यांना बूथ पर्यंत येताना सोईचे पडत होते. वाहतुकीचा अडथळा निर्माण होत नव्हता आचारसंहितेचे काटेकोरे व प्रभावीपणे अवलंब झाल्याचे बघायला मिळाले एकूण निवडणूक शांततेत पार पडली दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनातील कर्मचारी जो तो आपल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी काही नवीन मतदारांनी हक्क बजावताना सांगितले की जो उमेदवार विजयी होईल तो सर्वांना समान मानून मतदारसंघाचा विकास करेल. रब्बी हंगामाची गडबड चालू असताना मतदार राजा बाहेर निघाला नव्हता पण दुपारी चार वाजल्या नंतर मोठ्या प्रमाणात मतदाते मतदान कक्षाकडे मतदान करताना दिसत होते. तर काही ठिकाणी मतदात्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती.
