
राळेगाव तालुका प्रतिनिधी – रामभाऊ भोयर
दि.२२-०२-२०२३ ला उ.प्रा.शाळा ,वनोजा येथे ठीक ४ वाजता तहसिलदार रविन्द्रजी कानडजे यांनी शाळेला दिलेल्या आकस्मिक भेट दरम्यान वर्ग तपासणीच्या काही ठळक बाबी–प्रथम पुष्पगूच्छ देऊन मानसन्मान करण्यात आला.त्यानंतर वर्ग १ते३ वर्गाचे मराठी वाचन घेतले वर्ग दुसरीचा विद्यार्थी आर्यन अतुल बुटले याने मराठी पाठाचे वाचन केले व समाधान व्यक्त केले.त्यानंतर वर्ग ७ ला भेट दिला असता Verb तिन्ही रुपात व ing लावतांना कसा बदलतो व क्रियापद बारा काळात कसा बदलतो यावर तासिका सुरू होती एकूण ७० क्रियापदाचे ज्ञान उपक्रमाद्वारे जि.प.चे शिक्षक विद्यार्थांना देत आहे .मु.अ.चा प्रभार असुन सुद्धा दर्जेदार शिक्षणाचे धडे देत आहे हे कौतुकास्पद आहे.यानंतर कु.संजीवनी भास्कर जांभूळकर व कु.खुषी छत्रपाल सावध या विद्यार्थिनीला इंग्रजीच्या पाठ्यपूस्तकातिल शेवटच्या पाठाचे वाचन करायला लावले प्रनन्शिएशन सहित वाचन केले असून समाधान व्यक्त करून विद्यार्थांचे कौतुक केले व आनंद पण झाला अधिक प्रयत्न करण्याकरिता काही प्रेरणादायी बोल बोलून गेले की,जि.प. शाळेतूनच मोठेमोठे अधिकारी घडले तूम्हीपण खूप अभ्यास करा आणि मोठे व्हा .सविता उईके मॅडम यांनी ,साहेबांनी वर्गाला भेट दिल्याबद्दल आभार मानले.
त्यानंतर शाळेचा परिसर नीटनेटका व कार्यालय सुंदर केल्याचा आनंदाचा सूर काढतांना शाळेच्या भौतिक सुविधा ग्रामपंचायत मार्फत घ्या.यावर सखोल मार्गदर्शन केले.यावेळी शाळेचे सर्व शिक्षक उईके मॅडम,मेश्राम सर,शिंदे मॅडम हजर होते.
शाळेच्या अधिक विकासाकरिता बोलल्यामूळे शिक्षकांमध्ये उत्साह वाढून आंनदाचा सूर उमटला .
मानसन्मान करून आभार मानण्यात आले.
