
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
निझाम व इंग्रजांनी आपल्यावर अमानुष अत्याचार केला आहे. मात्र ठाकरे सरकार जणू काही त्यांचा विक्रम मोडू इच्छित असल्याप्रकारे शेतकरी बांधवांवर अन्याय करत आहे.अतिवृष्टीमुळे संकटात असलेल्या शेतकरी बांधवांना न्याय देण्याची भूमिका सोडून या सरकारने नवीन अध्यादेश काढत त्वरित विजेचे एच.पी. नुसार पैसे भरा अन्यथा वीज कनेक्शन कापू असा फतवा जारी केला आहे. या सरकारच्या शेतकऱ्यांप्रति केवळ संवेदना मेलेल्या नाहीत तर हे राज्य सरकारच शेतकऱ्यांसाठी मेलेलं आहे. त्या मुळे शासनाने काढलेल्या या जी आर ची होळी आज दि 2 नोव्हेम्बर रोजी भाजपा उमरखेड शहर तर्फे करण्यात आली आहे.
आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यापासून थांबवले नाही तर शेतकऱ्यांसाठी भाजपा अजून उग्र पने रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येने उमरखेड शहर भाजपाचे कार्यकर्ते व शेतकरी बंधु उपस्थित होते.
