
सहसंपादक : रामभाऊ भोयर
विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमा नुसार मंगळवार पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरवात झाली असून राळेगांव ७७ विधानसभा मतदार संघातून पहिल्या व दुसऱ्या दिवशी एकाही उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी एकही नामांकन दाखल केला नाही मात्र दिं २४ ऑक्टोबर २०२४ रोज गुरवारला भाजपा महायुतीचे उमेदवार प्रा.अशोक उईके यांनी हजारो समर्थकाच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भाजपचे उमेदवार प्रा.अशोक उईके यांची उमेदवारी दाखल करतांना मध्यप्रदेशचे ग्रामविकास मंत्री प्रल्हाद सिंह पटेल माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे माजी खासदार रामदास तडस माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ डांगे तसेच भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
