जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरला येथे पालक सहविचार सभेचे आयोजन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरला येथे पालक सहविचार सभेचे आयोजन दिनांक 22 सप्टेंबर 2022 रोज गुरुवारला करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सन्माननीय श्री जयंतराव कातरकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती येरला हे होते तसेच कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते .व पालक वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व पालक सभेला सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री कुंभारे सर यांनी पालक सभेचे प्रास्ताविक केले . त्यामध्ये त्यांनी शाळेच्या विविध उपक्रमाविषयी तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रगती विषयी माहिती सांगितली. आपल्या पाल्यांना नियमित शाळेत उपस्थित ठेवावे व त्याच्या नियमित गृहपाठ सोडवतो की नाही त्याबाबत त्याला मार्गदर्शन करावे असे आव्हान त्यांनी केले त्यानंतर अनेक पालकांनी समाधान व्यक्त करून आपल्या समस्या सांगितल्या व सर्व विषयावर चर्चा करण्यात आली. शालेय योजना, विद्यार्थ्यांची प्रगती, विविध शिष्यवृत्ती याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय जयंतराव कातरकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती येरला यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी पालकांतर्फे आपले विचार मांडले त्यांनी शाळेच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले . शाळेच्या प्रत्येक कार्य आमचे सहकार्य राहील असे आश्वासन दिले त्यानंतर श्री बारापात्रे सर यांनी उपस्थित सर्व पालकांचे व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे सर्वांचे आभार मानले आणि पालक सभेचे सांगता करण्यात आली.