के. बी. एच. विद्यालयात डॉक्टर्स डे साजरा


महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या के. बी. एच. विद्यालय पवन नगर सिडको येथे विशाखा समितीच्या वतीने डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला.
गेल्या पस्तीस वर्षापासून वैद्यकीय सेवेत असणारे पवन नगर परिसरातील केअर रेनिसस हॉस्पिटलचे मेडिकल सुप्रीटेंडेंट आणि सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर प्रशांत आंबरे प्रमुख वक्ते होते
पश्चिम बंगालचे डॉक्टर बी.सी.रॉय यांचा जन्मदिवस भारतात डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो असे सांगून सामाजिक सेवा सर्वात महत्त्वाची आहे त्यासाठी मनात समाजसेवा करायचे असले की बाबा आमटे यांनी निर्माण केलेले जगप्रसिद्ध आनंदवनाची निर्मिती होते असे ते म्हणाले पुढे ते म्हणाले की आयुर्वेदापासून ते अॅलीपथीपर्यंत सर्वच पॅथी उपयुक्त आहेत. आया, मावशी,नर्स, वाॅरड बॉय हे सर्वच घटक वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात असेही ते म्हणाले.यावेळी डाॅ.आंबरे यांनी सादर केलेल्या एक झाड लावा या कवितेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. विद्यार्थ्यांनी जंक फूड ऐवजी सकस आहार घ्यावा. आहार,विहार व निद्रा या ञिसुञीचे पालन विद्यार्थ्यांनी करावे यासाठी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक श्री. यु. बी. देवरे सर होते.मा. श्री.देवरे सरांच्या हस्ते डाॅ.आंबरे यांचा सत्कार करण्यात आला.प्रमुख पाहुणे मा. पर्यवेक्षक श्री. हिरे पी.एच. होते
कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन विशाखा समितीच्या अध्यक्षा श्रीमती संजीवनी पाटील यांनी केले.