
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कळम तालुक्यतील डोंगरखर्डा :- तिधरी च्या जंगलातील शेतात गाईच्या कारवड लारात्री १२ वा वाघाने लक्ष करून ठार केले. तिधरी येथील शेतकरी गुलाब कवडू मोरे हे स्वतःच्या शेतात पिकांची राखण करण्यासाठी दररोज जात होते. जंगल नजीक शेत असल्याने रोही व जंगली डुक्कर चा त्रास असल्याने चार्जिंग बॅटरी लावून पिकांचे रक्षण करीत असताना रात्री १२ वाजता गोठ्यात बांधून असलेले गाईचे कारवड दचाकल्याने बघितले असता समोर वाघ दिसला. लगेच गोठ्यावर चढून बसले. तो वाघ कारवड वर हल्ला करून ठार केले. वाघ निघून गेल्यावर गुलाब मोरे खाली उतरले.
सकाळी त्यांचा मुलगा बॅटरी चार्जिंग करण्याकरिता शेतात घेण्यासाठी गेले असता सदर प्रकार लक्षात आला. जोडमोहा वनपरीक्षेत्र अधिकारी संजय केराम यांच्या मार्गदर्शनात वनपाल रवींद्र बकाल वनरक्षक अक्षय डुकरे पशुधन पर्यवेक्षक चंदनखेडे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. वनविभागाकडून ट्रॅप कॅमेरा बसविण्यात येणार आहे. असे वनपरीक्षेत्र अधिकारी संजय केराम यांनी सांगितले. पुन्हा वाघाचा वावर या भागात दिसून आल्याने परिसरातील शेतकरी शेत मजूर धस्तावले आहे.
