

प्रतिनिधी:प्रवीण जोशी ढाणकी
अखिल हिंदू संघटन ढाणकी यांच्यातर्फे नेहमीच समाज उपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवितात. नवरात्र उत्सवाच्या निमित्याने रोज एका मंडळांनी शहरातील महापुरुषांना माल्यार्पण करून आदरांजली वाहण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रम करण्याचे ठरविले आहे.
त्यानिमित्ताने दिनांक 26 सप्टेंबर ला पहिला दिवसाचा माल्यार्पण करण्याचा मान हनुमान दुर्गाउत्सव मंडळाला मिळाला यांचे तर्फे वैष्णवी पंकज कोडगिरवार या बालिकेने छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण केला व वंदन केले अशा उपक्रमामुळे बालकांमध्ये महापुरुषा प्रती नक्कीच आदराची भावना निर्माण होईल.
