सफाईदार व गुळगुळीत रस्त्याच्या निर्मितीमुळे नक्कीच विकासाला मिळत आहे गती


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी


सतत नऊ वर्ष नरेंद्र मोदी पंतप्रधान असून त्यांच्या सत्ता काळात अत्यंत महत्त्वाचे काम झाले ते म्हणजे देशांतर्गत दळणवळण व्यवस्था, नक्कीच रस्त्याची निर्मिती करण्यात केंद्रीय भूपृष्ठ व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचा भरीव मोठा वाटा आहे. तसेच नितीन गडकरी हे महाराष्ट्राचे रस्ते वाहतूक मंत्री होते त्यावेळेस सुद्धा राज्यात उत्कृष्ट कामगिरी केली म्हणून केंद्रात सुद्धा बहुदा त्यांना हे खात दिलं असावं.

विविध सीमावर्ती राज्यांना जोडणाऱ्या रस्त्याची निर्मिती झाली विशेष म्हणजे गाव पातळीवरील रस्त्याची निर्मिती केली आणि शहरांना लाजवेल अशा प्रकारचे रस्ते गावोगावी होताना दिसत आहेत. खेडे गावापासून महामार्गाची निर्मिती होत असताना कुठलेही लहान मोठे गाव महा महामार्गापासून जास्त दूर राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली अर्थातच गाव खेड्यापासून वीस ते पंचवीस किलोमीटर परिघातील गाव खेड्यापासून हा मार्ग गेलेला आढळतो आणि याचे श्रेय जाते ते नितीन गडकरी यांना उत्कृष्ट दळणवळणाच्या सुख सुविधा निर्माण झाल्या त्यामुळे शेतकरी आपला माल जलद गतीने शहरातील बाजारपेठेत नेऊ लागली आणि शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती उंचवण्यास मदत झाली गावचा विकास होण्यास गुळगुळीत रस्त्याचा फार मोठा वाटा असतो रस्ते सफाईदार झाल्याने ग्रामीण अर्थकारनाला अधिक गती आली खेडोपाडी दुचाकी चारचाकी वाहने झाली त्यामुळे अनेक रोजगार निर्मिती झाली एक मनी एकास जोडल्या नंतर माळ बनते एक गाव एका गावाशी जोडल्या गेल्याने खेडी गावे समृद्ध होण्यास मदत होते व सद्यस्थिती बघता ते समृद्ध बनण्याच्या मार्गावर आहेत याला कारणीभूत ठरत आहेत विस्तारित असलेले रस्त्याचे जाळे परंतु आता ही रस्ते उत्कृष्ट कसे राहतील व याची काळजी घेण्याची जबाबदारी सर्वांची आहे हे नाकारून चालणार नाही कारण त्यामुळे आपला विकास होण्यास मदत होत आहे