
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून स्वस्त दरात मिळालेला तांदूळ थेट खाजगी दुकानात विक्रीसाठी जाताना सर्वसामान्य माणसाला दिसतोय पण महसूल विभागाच्या पुरवठा अधिकाऱ्याला मात्र का दिसत नाही?…
कारण स्पष्ट दोन्ही कडून “मोठी माया” मिळत असल्याने एक ही कायदेशीर कारवाई राळेगाव तालुका व शहरात या वर्षी झालेली निदर्शनास आली नाही…
रेशन च्या तांदूळा चा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु आहे, प्रत्येक गावात तांदूळ शासकीय स्वस्त धान्य दुकानातून वितरित झाल्याबरोबर खरेदीदार आपल्या खाजगी वाहनां द्वारे तांदूळ विकत घेऊन सरळ मोठ्या दुकानात विक्रीसाठी जातात…
या मध्ये तीन दुवे महत्त्वाचे, एक दुकानदार, दुसरा विकत घेणारा चिल्लर विक्रेता, ठोक विक्रेते हा सर्व आतबट्ट्याचा व्यवसाय म्हणा की व्यवहार दरमहा पन्नास पेटी च्या वर असल्याची चर्चा मद्यालयातून बाहेर पडली आहे, यांत कितपत सत्य आहे हे तपासून पाहण्याची गरज वरिष्ठ अधिकाऱ्यां ना आतापर्यंत का वाटली नाही? हे देखील न उलगडणारे कोडे आहे.
