राळेगांव तालुक्यातील शेतकऱ्यांचे तहसील कार्यालया समोर दुसरा दिवस धरणे आंदोलन

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


राळेगांव यावर्षी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थीक नुकसान झाले आहे . महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी १३६०० रूपयाची मदत जाहिर केली स्थानिक प्रशासनाने वेगवेगळे निकष लावून ५० ते ६० टक्के रक्कमेची मदत शेतकऱ्यांना दिला . बाजूच्या पांढरकवडा व मारेगांव तालुक्यात १३६०० प्रमाणे वाटप करण्यात आले परंतु सर्वात जास्त नुकसान व पाऊस राळेगांव तालुक्यात असतांनाच मदत वाटप कमी करण्यात आला . तरी १३६०० प्रमाणे त्वरीत फरकाची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी . तसेच महाराष्ट्र

सरकारने जाहिर केलेले नियमीत कर्जदार शेतकऱ्यास ५०००० ( पन्नास हजार रूपये ) अनुदानाची रक्कम अजुनपर्यंत मिळालेली नाही मोजक्याच शेतकऱ्यांना ती मिळाली . शासनाने ती त्वरीत दयावी . शेतकऱ्याने काढलेल्या पिकवीम्याची रक्कम भिषण दुष्काळी परिस्थीती असतांना सुध्दा शेतकऱ्यांना मिळाली नाही ती त्वरीत देण्यात यावी . रब्बी हंगामासाठी ओलीताकरीता दिवसा १२ तास विज पुरवठा करण्यात यावा . तसेच महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना व छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना या दोन्ही योजनेअंतर्गत कर्जमाफी न मिळालेल्या थकित कर्जदार शेतकऱ्यांना त्वरीत कर्ज मुक्ती दयावी व भिषण दुष्काळी परिस्थीती असल्यामुळे गोपालक व गोवंश पालक शेतकऱ्यांना जनावराकरीता गोसंरक्षण संस्थेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना चाऱ्याकरीता अनुदान देण्यात यावे अशा मागण्या धरणे आंदोलनांत आहे . तहसील कार्यालया समोर तालुक्यांतील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आज पासून धरणे आंदोलन सुरु केले आहे . यात अनिल जवादे अनिल देशमुख गणेश नेहारे बंडू देशमुख धनंजय पाटील विनोद काकडे भारत मरस कोल्हे नरेश मडावी शंकर वरगट तृषित इंगोले राजू शिवनकर अनिल देशमुख सचिन राडे गणेश राठोड सोमनाथ राठोड अविनाश खैरी अमीन आष्टकार होमराज गुरनुले नामदेव ढोरे पांडुरंग सोनवणे यांची उपस्थिती होती .