राळेगाव च्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा वेतन व पेन्शन च्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढत एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना निवेदन.

राळेगाव तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा आक्रोश मोर्चा दिनांक ४-१२-२३ पासुन आपल्या हक्काच्या वेतनासाठी व पेन्शन या मागणीसाठी संप सुरू करण्यात आला आहे . यासंदर्भात अनेकवेळा सांगुनही शासन जाणुनबुजून अंगणवाडी सेविका यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते.याकरीता नागपुर येथे अधिवेशनात भव्य मोर्चा नेऊन सुद्धा या झोपलेल्या सरकारला जाग आला नाही कुठलाही अंगणवाडी सेविका यांच्या वेतन व पेन्शन या मागण्याच्या विचार न करता शासन फक्त या अंगणवाडी सेविकांच्या मागण्यावर मीठ चोळण्याचे काम करीत आहे त्यामुळे राळेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविकांच्या महाराष्ट्र सरकारचा तीव्र निषेध करून आक्रोश मोर्चा काढुण राळेगाव येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी सागर विठाळकर यांना निवेदन देण्यात आले.यावेळी विजयाताई सांगळे जिल्हाध्यक्ष,ज्योतीताई कुलकर्णी जिल्हा सचिव,लताताई माटे राळेगाव तालुका अध्यक्ष, सर्कल प्रमुख लता अवतारे,गुंफा कीन्हाके, कल्पना महाकुलकर,बबिता सोनटक्के,मंदा आमटे,कल्पना बागेश्रर,महेश सोनेकर,गेडाम साहेब माजी नायब तहसीलदार, जेष्ठ पत्रकार कैलास वर्मा, पत्रकार अशोक पिपरे, पत्रकार विनोद माहुरे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी व धिक्कार कृतीसमितीच्या वतीने राळेगाव तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.