
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव येथील काळे ले-आऊट गणेश नगर येथील साई मंदिराचा स्थापनेचा चतुर्थ वर्धापन दिन सोहळ्या निमीत्त माघ तिथी रविवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजता साई बाबांचा अभिषेक, सकाळी ९ वाजता पुजन, हवन आणि रात्री ७ वाजता भजनाचा कार्यक्रम होईल. दुसऱ्या दिवशी दि. ७ फेब्रुवारी ला सकाळी ९ वाजता साई बाबांची पालखी व दिंडी परिक्रमा साई मंदिर, काळे ले-आऊट, गणेश नगर येथून मंदिरात परत येईल. दुपारी तीन वाजता काल्याचे भजन व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.
या मंगल सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी सहभागी व्हावे आणि दिंडी व पालखीच्या स्वागतासाठी आपआपल्या घरासमोर सुशोभित रांगोळी काढावी असे आवाहन या सोहळ्याचे आयोजक सुरेशसिंह बाबुसिंह गहरवाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
