धम्मभूमी कोटंबा येथे मार्गशिर्ष पौर्णिमे निमित्त मुच्छलिंद नागप्रतिमेची प्रतिष्ठापणा व धम्मदेसना ,धम्मप्रबोधन कार्यक्रम

तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

कोटंबा: बुद्ध संदेश शिक्षण प्रचार सभा, धम्मभूमी मासिक पत्रिका, साप्ताहिक शेतकरी सत्ता कोटंबा ता.बाभूळगाव जि. यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने धम्मभूमी महाविहार कोटंबा येथे दि. १९ डिसेंबर २०२१ रोजी, मार्गशिर्ष पोर्णिमे निमित्य भगवान बुद्धाच्या भव्य मुच्छलिंद नागप्रतिमेची प्रतिष्ठापना, परित्राण, धम्मदेसना, धम्मप्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी संघ नायक पूज्य भदंत सुमंगलबोधी महास्थवीर ( अकोला) , पूज्य भदंत चंद्रमणी महास्थवीर ( अमरावती ), पूज्य भदंत राहुलबोधी महास्थवीर अध्यक्ष ऑल इंडिया भिक्षु संघ ( यवतमाळ ), पूज्य भदंत सरनंकर महास्थवीर विपश्यना आचार्य नागपूर, पूज्य भदंत राजरतन महाथेरो, पूज्य भिक्षु धम्मसार, पूज्य भिक्षु धम्मरतन, आर्या विशाखा, आर्या वैशाली आदि पूज्य भिक्षु गण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.विजयजी डांगे व्यवस्थापक धम्मभूमी कोटंबा तसेच प्रमुख अथिती म्हणून मा.अँड. गोविंदरावजी बन्सोड सेवा निवृत्त सरकारी अभियोक्ता यवतमाळ, मा. रमेशराव लोहकरे साहेब सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक मुंबई, मा.डॉ.टि.यु.फुलझेले साहेब सेवानिवृत्त संचालक इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ दिल्ली, मा.प्रा.रविंद्र दारुंडे आर्वी, मा.अँड. निरंजन दवणे उमरखेड आयु.डी.एन. भगत सर, आयु दिलीप वाघमारे, आयु अशोक कांबळे, आयु. नाईक सर, आयु.शंभरकर सर, आयु.विनय डांगे, आयु.लक्ष्मनराव भगत, कोटंबा ग्रा.प.चे सरपंच सौ.सुनंदाताई वाकेकर, आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी धम्मदेसना करतांना पूज्य भदंत सुमंगलबोधी महास्थवीर ( अकोला) म्हणाले कि, उपासकांनी धम्ममार्गावर आरूढ होऊन धम्माचे प्रतिपालन करावे, प्रमुख अतिथीय भाष्य करतांना मा.डॉ.टि.यु.फुलझेले साहेब म्हणाले कि, ज्या- ज्या राष्ट्रांनी बुद्धांचे विचार स्वीकारले ते – ते राष्ट्र आज महासत्ता म्हणून उदयास आले. मा. रमेशराव लोहकरे साहेब मनोगत व्यक्त करतांना म्हणाले कि, धम्मभूमीकडे बघितल्या नंतर अपेक्षेपेक्षाही अधिक भरभराट व विकास दिसून आला. आदरणीय प्रा.रविंद्र दारुंडे सर यांनीही धम्मप्रबोधन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्मभूमी,बुद्ध महाविहार कोटंबा चे व्यवस्थापक मा.विजयभाऊ डांगे साहेब म्हणाले कि, शिक्षण सर्व विकासाचा पाया असून शिक्षणाचे महत्व सर्वांनी जाणून घ्यायला हवे, व शिक्षणाला धम्माची जोड असावी.
कार्यक्रमाला अनेक गावांवरून उपासक उपासिका मोठ्या संख्येने पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित होते. कार्यक्रमात मा.रमेशराव लोहकरे साहेब, मा.टी.यु.फुलझले साहेब, सौ.अरुणाताई बन्सोड, व अनेक उपासकांनी धम्मदान देवून आपली पुण्यपारमी पुष्ठ केली.
परिसरात या वेळी उपस्थित भिक्षु संघ व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, तसेच वसतिगृहातील गरजवंत विद्यार्थ्यांना उपस्थितांच्या हस्ते, शालेय गणवेश व उपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. समता ढेंगळे यांनी केले, संचालन आयु.डी.एस.कांबळे यांनी केले तर आभार आयु. अश्विन खोब्रागडे यांनी मानले.