वन्यप्राण्यांनी केली वडकी येथील शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट,नुकसान भरपाईची शेतकऱ्यांनी केली मागणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील वडकी,खडकी,कारेगाव,उमरेड या परिसरामध्ये वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहेत. शेतातील उभे असलेले कपाशी, तुर, गहू, भाजीपाला आदी पिकांना जमीनदोस्त करीत आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वडकी येथील शेतकरी प्रशांतजी पिपराडे केली आहे.जंगली वन्यप्राणी उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतो तसेच माकड सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. सदर प्राणी उभ्या झाडांना मोडून कपाशीचे बोंडे, तुरीच्या शेंगा खातात. झाड मोडल्यामुळे त्या झाडांना लगणारे बोंडे व शेंगा वाळून जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वन्य प्राण्यांच्या धुमाकुळामुळे शेतीला लावलेला खर्च निघते की नाही हाच प्रश्न शेतकºयांना भेडसावत आहे.
वन्य प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानाची भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. आहे. बरेचदा नुकसान मोठे व भरपाई कमी असा प्रकार घडतो. त्यामुळे आर्थिक संकट शेतकºयांवर येते.वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे उत्पन्नात चांगलीच घट येऊ शकते. याकरिता संबंधीत विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वडकीचे माजी सरपंच तसेच शेतकरी प्रशांतजी पिपराडे यांनी केली आहे.