रामतीर्थ कार्यकारी सहकारी सोसायटी अध्यक्ष पदी रमेश इंगोले

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

 

राळेगाव तालुक्यातील रामतीर्थ कार्यकारी सहकारी सोसायटी अध्यक्ष पदी रमेश शंकरराव इंगोले तर उपाध्यक्ष पदी सचिन संतोषराव खडसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.निवड करतेवेळी संचालक मंडळ शंकरराव वामनराव आगलावे,नारायण देवरावजी इंगोले,बाळकृष्ण बापुराव नेहारे,बाळा शंकरराव दिघडे,नरेंद्र पांडुरंग काकडे,सुरेश चिंधुजी उईके, दिलिप वारलुजी मोरे,शंकर शामराव भोग,राजु देविदासजी भोयर,सौ.संगिता कीशोर आगलावे,सौ.शालीनी महादेवराव महाजन व नंदकुमार कीसनाजी मासुरकर उपस्थितीत होते.सर्व संचालक मंडळ यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड केल्या बद्दल अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी संचालक मंडळाचे आभार मानले आहे.