
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील मेंघापुर येथील होऊ घातलेल्या ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक ही दोन्ही गटांनी प्रतिष्ठेची केली असतांना झालेल्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित प्रफुल्लभाऊ मानकर गटाचे नितीनजी विनायकराव काकडे यांनी निवडून आणल्यानंतर आज दिनांक 26/4/2022 रोजी होऊ घातलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत श्री नितीनजी विनायकराव काकडे यांचा अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने यांना अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले.त्यावेळी सर्व संचालकांचे सहकार्य लाभल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री नितीनजी विनायकराव काकडे यांनी सांगितले.सोबतच सर्व संचालकांचे आभार सुध्दा मानले असून यांच्या निवडीमुळे काॅंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते तथा मित्रपरीवाराकडून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
