राळेगाव येथे 15 नोव्हें. रोजी जननायक बिरसा मुंडा जयंती उत्सवाचे आयोजन ( भव्य शोभयात्रा, सुप्रसिद्ध लोकगीत आर्केस्ट्रा व लक्षवेधक चित्ररथाचे नियोजन )

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

  

राष्ट्रीय जनजाती गौरव दिनाचे औचित्य साधून बिरसा मुंडा उत्सव समिती राळेगाव व आ. प्रा. डॉ. अशोक उईके यांचे संयुक्त विध्यमाने भगवान बिरसा मुंडा जयंती उत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.15 नोव्हें.रोजी स.11.00 वा.बिरसा मुंडा चौक येथून भव्य शोभायात्रा तर सायं.6वा. वसंत जिनिंग राळेगाव येथे आदिवासी लोकगीत आर्केस्ट्रा चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमात आदिवासी बांधव, माता भगिनीं व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आ . प्रा. डॉ. अशोक उईके उत्सव समितीचे अध्यक्ष सुधाकर गेडाम, सचिव संदीप पेंदोर, कार्याधक्ष दिलीप कन्नाके व समितीचे पदाधिकारी आयोजकांच्या वतीने करण्यात आले .
जननायक, क्रांतिसूर्य, भगवान बिरसा मुंडा यांनी उलगुलान चा नारा दिला. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली. जल, जंगल, जमीन यांचे रक्षण, हक्क अधिकार व स्वाभिमान याची प्रखर ज्योत प्रज्वलीत करण्याचे कामं भगवान बिरसा मुंडा यांनी केले.15 नोव्हें. हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय जनजाती गौरवदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निमित्त राळेगाव येथे त्यांच्या अतुलनीय कार्याला उजाळा देण्याकरिता या जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बिरसा मुंडा चौक राळेगाव येथून स.11 वा भव्य शोभयात्रा निघणार आहे यात लक्षवेधक झं|की, पुस्पवृस्टी,बिरसा मुंडा यांचे जीवनकार्य प्रदर्शीत करणारा लक्षवेधक चित्ररथ हे आकर्षणाचे केंद्रबिंदू असणार आहे. सायं.6 वा. भाऊसाहेब कोल्हे सभागृह राळेगाव येथे सुप्रसिद्ध आदिवासी गायक रेला रवी मेश्राम व संच यांचा लोकप्रिय लोकगीत व आर्केस्ट्रा चा कार्यक्रम होईल.
क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्सवाच्या या अभूतपूर्व सोहळ्याला तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे, व जननायकाच्या अतुलनीय कार्याला उजाळा देऊन, प्रेरणा घेऊन विकासाचा मार्ग प्रशस्त करावा त्या करीता बहुसंख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन बिरसा मुंडा उत्सव समिती राळेगाव व आ. प्रा. डॉ. अशोक उईके यांनी केले आहे.


भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला दिशा देण्याचे कामं केले. राळेगाव येथे 15 नोव्हें. 2023 रोज बुधवार ला बिरसा मुंडा जयंती उत्सव समितीचे वतीने भव्य शोभयात्रा, चित्ररथ, झं|की व प्रसिद्ध लोकगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विकासाच्या प्रक्रियेत येण्याकरिता आपल्याला भगवान बिरसा मुंडा यांनी मार्ग दाखविला. त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन आपल्याला संघटित प्रयत्न करायचे आहे. त्या करीता या भव्य कार्यक्रमात मोठया संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.


आ. प्रा. डॉ. अशोक उईके