
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
रिलायन्स फाउंडेशन व तहसील कार्यालय राळेगाव यांच्या विद्यमाने झाडगाव, ऐकबुर्जी, भाम,सावंगी, चाहांद,लाडकी, दापोरी कासार,रावेरी, पिंपळखुटी,चिकना, वालदुर, इंजापुर,कोपरी, कोची आणि कारेगाव या गावांमध्ये पूरग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी १५०० कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. सदर रेशन किट ही रिलायन्स फाउंडेशन मार्फत देण्यात आले होते. या किट मध्ये गहू आटा, तांदूळ, तेल, हळद, मसाला,ब्रश, पेस्ट, साबुन,तूरडाळ,साखर, मिठ याप्रकारे १६ किलो ची किट प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबांना देण्यात आली. कोची गावामधे माननीय डॉ. रवींद्र कानडजे, तहसीलदार राळेगाव प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच प्रत्येक गावातील सरपंच, उपसरंच, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर पदाधिकारी , समाजसेवक व पंचायत समिती चे माजी सभापती हे पिंपळखुटी येथे उपस्थित होते. दिनांक १० ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२२ या पाच दिवसांमध्ये रिलायन्स फाउंडेशन ची टीम श्री. मारुती खडके, कार्यक्रम समन्वयक महाराष्ट्र राज्य, श्री. प्रफुल बनसोड, व्यवस्थापक यवतमाळ जिल्हा, श्री. राजेश कांबळे, श्री . तेजस डोंगरिकर, रिलायन्स जीओ चे श्री. अविनाश शर्मा व त्यांची टीम यांनी विशेष श्रम घेतल्यामुळे वाटप कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला. या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये उमेद प्रकल्पाचे तालुका व गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांचे तसेच श्री सुनील भेले, युवा वेद मंच संस्था यांचे सहकार्य लाभले.
