भाजपा सोशल मीडिया संयोजक शुभम जैस्वाल यांचा प्रदेशा अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या हस्ते काँग्रेस मध्ये प्रवेश.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

काँग्रेस पक्ष हा सामान्य कार्यकर्तेत्यांना न्याय देणारा जातीभेद विरहित धर्मभेद, नसणार सर्व जाती जमाती मागासवर्गीय दिन दलित उपेक्षित समाजाला न्याय देणारा पक्ष हा काँग्रेस पक्षाचा विचाराला प्रेरित होऊन तरुण युवकांना न्याय देणारे राहुल गांधी यांच्या धडाडीच्या कार्याला समर्पित होऊन तसेच महाराष्ट्राचे प्रदेशा अध्यक्ष श्री नाना भाऊ पटोले यांनी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाची धुरा सांभाडत असून त्यांनी महाराष्ट्रातील तरुण युवकांना काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळात पोहचण्याचे जे कार्य सुरू केले आहे त्यांच्या कार्याचे महत्व अनुसरून आज रोजी शुभम जैस्वाल यांनी नाना भाऊ पटोले यांच्या हस्ते काँग्रेस मध्ये प्रवेश केला. या प्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटी यवतमाळ चे अध्यक्ष आमदार वाजाहत भाई मिर्झा चेअरमन वक्त बोर्ड तसेच महाराष्ट्राचे सरचिटणीस देवानंद भाऊ पवार, जिल्हा काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस किरण भाऊ कुमरे व तसेच युवक काँग्रेस चे विशाल भाऊ मुक्तेमवर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करण्यात आला.
श्री किरण भाऊ कुमरे यांच्या पुढाकाराने शुभम जैस्वाल यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्याची जवाबदारी पार पाडली शुभम जैस्वाल यांच्या कडे सोशल मीडिया व राळेगाव परिसरातील व जिल्ह्यातील पदवीधर विद्यार्थ्यांचे मोठे प्रमाणात संघटन आहे व तसेच युवकांची पळी मोठ्या प्रमाणात आहे आमदार वाजाहत भाई मिर्झा यांनी शुभम जैस्वाल यांना आपल्या सोशल मिडीडीया मार्फत काँग्रेस पक्षाचे विचार व ढेर्य धोरण समाजातील ताळागाडा पर्यंत पोहचवावे अश्या शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.