कोच्ची ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मधुकरभाऊ जवादे यांच्या शेतकरी विकास पॅनलने वर्चस्व कायम

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

दिनांक २८-५-२२ रोजी कोच्ची ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था र.न. ३०५ च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मधुकर जवादे यांच्या शेतकरी विकास पॅनलने सर्व साधारण कर्जदार प्रतिनिधी मतदार प्रवर्गातुन १) पुरुषोत्तम वासुदेव इंगोले २) नंदकीशोर नामदेव गोफणे ३) मधुकर वामन जवादे ४) रविंद्र गोपाळा ठाकरे ५) सुरेश तुळशीराम ठाकरे ६) संजय माधव बुटे ७) वसंत हरीभाऊ भेदुरकर ८) नारायन मारोती हिवरकर महीला प्रतिनिधि मतदार प्रवर्गातुन ९) सौ . छाया राजु भेदुरकर १०) सौ. सरला रमेश महल्ले. इतर मागास वर्गीय मतदार प्रवर्गातुन ११) गजानन लक्ष्मन हिवरे अनुसुचित जाती/जमाती मतदार प्रवर्गातुन १२) पंकज विलास वेले तर वि.जा.भ.ज./ वि.मा.प्र.प्रवर्गातुन १३) हरीभाऊ गंगाराम बावणे असे तेरा पैकी तेराही उमेदवार प्रतिस्पर्धी असलेल्या युवा परावर्तन पॅनलच्या तेराही उमेदवारांचा पराभव करून बहुमतांनी दनदनीत विजय झाले.