खैरी गाव समस्यांच्या विळख्यात ,लोकप्रतिनिधींनी फिरविली पाठ

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

खैरी हे गाव राळेगाव तालुक्यात मोठे असुन या गावच्या विकासासाठी कोणीही निधी मंजूर करण्यास तयार नाही आहे. खैरी गावातील मेन मार्केट मधील रोडची दुर्दशा झाली आहे.खैरी गावातील रस्त्यांवर खड्डे पडले असून या रस्त्यातून ये-जा करतांना तारेवरची कसरत करावी लागत असून कधी कधी किरकोळ अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच गावाच्या सभोवतालच्या वार्ड नंबर ४ मधील रोड तर खुपच खराब झाला आहे. निवडणूका आल्या की फक्त खैरी गावात येत असतात. पण आता मात्र त्यांना खैरी गावाचे त्यांना काहीपण देणेघेणे दिसत नाही आहे. अशी आतातरी लोकप्रतिनिधी या गावाकडे लक्ष देऊन आपआपल्या निधी रोडसाठी मंजुर करुन रोड बनवुन द्यावा अशी खैरी येथिल नागरीकांची मागणी होत आहे.