सावंगी पेरका येथे गळा आवळून युवकाचा खून

राळेगाव व सावंगी पेरका येथिल शेतात रोशन नानाजी शेंद्रे (26) या युवकाचा शेतात गळा आवळून खून करण्यात आल्याची खळबळ जनक घटना निदर्शनास आली . सावंगी पेरका येथील नानाजी किसनराव शेंद्रे (62) यांचा तरुण मुलगा रोशन हा त्याच्या शेतात असताना आरोपी खुशाल मारोतराव ढुमणे (37) याच्या सोबत वाद झाला परंतु नेमका कोणत्या कारणासाठी हा वाद होता हे कळले नाही वाद वाढत जावून त्याच्यात झटापट झाली . खुशाल ने या झटापटीत रोषाचा गळा आवळला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला या बाबत त्याच्या पिता नानाजी शेंद्रे याने राळेगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध कलम 302 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून खूना सारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास कासव गतीने सुरू असल्याची चर्चा आहे.

प्रतिनिधी:रामभाऊ भोयर