गोपालनगर वासीयांची पाण्यासाठी वाणवा,समस्यांकडे दुर्लक्ष

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

          

राळेगाव तालुक्यातील आदिवासी बहुल व संपूर्ण पारधी समाज असलेले साडेचारशे लोकसंख्येचे असलेले गांव ४५ अंश तापमानात पाण्यासाठी पायपीट करीत आहे . सविस्तर वृत्त असे की श्रीरामपूर कोदुर्ली गोपालनगर गटग्रामपंचायत आहे . यातच गोपालनगर मध्ये शंभर टक्के पारधी समाज आहे . विकासा पासून कोसो दूर असलेल्या गोपालनगर मध्ये उच्च विद्याविभूषीत तरुण आहे . गोपालनगर गावाला पाणी पुरवठा करणारी योजना पाचवर्षापूर्वी कार्यान्वित झाली आहे . छोटया मोठ्या समस्येने पाणी पुरवठा खंडीत होतो .सद्य स्थितीत पाणी पूरवठा करणारी यंत्रणा नादुरस्त आहे . याला कारण शुल्लक आहे . विहीरी वरून पाणी पुरवठा गावात होतो गावांत पाणी देण्याची व्यवस्था करणारा व्हॉल अज्ञात व्यक्ती ने फोडला या घटनेला एकमहिना झाला सरपंच व ग्रामसेवकाला माहिती दिली त्यांनी थातूरमातूर चौकशी केली निष्पन्न काहीच झाले नाही. एक महिण्या पासून एकाच हॅन्डपंप वरून गोपालनगरवासी पाणी भरत आहे . यात आपसात वादविवाद दररोज होते . यासंदर्भात सरपंच व ग्रामसेवक यांना वारंवार ग्रामस्थांनी विनंती केली असता जानून बुजून दुर्लक्ष केल्या जात आहे . येत्या दोनदिवसात व्हॉलची दुरुस्ती करुन पाणी पुरवठा सुरळीत सुरू झाला नाही तर आम्ही पंचायत समिती समोर उपोषणाला बसल्या शिवाय राहणार नाही असा ईशारा पवन पंजाबराव पवार , सोमनाथ पवार, पंकेश पवार, विठ्ठल पवार, प्रकाश फुलमाळी , सुखदेव पवार, श्रावण काळे, कांलींदा काळे, सागर फुलमाळी , गणेश पवार या ग्रामस्थानी दिला आहे.