
आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आपल्या दारी च्या वतीने मुर्सा गावातील लोकांच्या अनेक समस्यांचे निवारण करण्यात आले. ज्यामध्ये लोकांचे निराधार, ई-श्रम कार्ड राशन कार्ड हे निशुल्क लोकांना वितरित करण्यात आले. ज्या लोकांचे मेडिकल वयाचा दाखला नव्हता अशा लोकांना आकाश वानखडे यांनी स्वखर्चाने ग्रामीण रुग्णालयात नेऊन त्यांचे मेडिकल कार्ड बनवुन देण्यात आले. आकाश वानखेडे यांच्या आयोजनातून दिनांक 23/03/2022 रोज बुधवारी दिवसभर हा कार्यक्रम राबविण्यात आला. ज्यामध्ये भाजपाचे पदाधिकारी विस्मय बहादे, चैतन्य कोहळे, गणेश ठाकरे,आफताब शाह, रविंद्र साळवे,श्रीकृष्ण उरकुडे, शंकर कोहळे व युवा मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
