राळेगाव तालुक्यातील सावंगी पेरका येथे विदर्भस्तरीय भव्य खंजेरी स्पर्धा आयोजित

राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील सावंगी पेरका येथे जय गुरुदेव सेवा मंडळ आणि समस्त गावकरी व्दारा आयोजीत विदर्भ स्तरीय भव्य खंजेरी स्पर्धा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व श्री संत गाडगे महाराज यांची 53 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विदर्भस्तरीय भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. खंजेरी भजन स्पर्धेचे उद्घाटन 1 जानेवारी 2022 ला सायंकाळी नऊ वाजता असून कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार माननीय प्राचार्य डॉक्टर अशोकरावजी उईके यांच्या हस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री एडवोकेट गजाननराव खैरकर पांढरकवडा, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संजयराव तोडासे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय पांढरकवडा, माननीय श्री संजय राव चौबे पोलीस निरीक्षक राळेगाव, माननीय श्री चित्तरंजनदादा भाऊसाहेब कोल्हे जिल्हा परिषद सदस्य, माननीय श्री प्रशांत भाऊ तायडे पंचायत समिती सभापती राळेगाव, माननीय श्री मधुकरराव गेडाम सेवानिवृत्त तहसीलदार राळेगाव, माननीय श्री डॉक्टर कुणाल भाऊ भोयर राळेगाव, माननीय श्री पुरुषोत्तमराव ओंकार से.नि.गटशिक्षणाअधिकारी राळेगाव, माननीय श्री रमेशराव पोतराजवार पांढरकवडा हे उपस्थित राहणार असून सर्व भक्तांनी सुद्धा या भव्य विदर्भ स्तरीय खंजेरी स्पर्धेमध्ये उत्साह वाढवण्याकरता उपस्थिती असणे प्रार्थनीय आहे अशी विनंती शंकररावजी तोडासे गुरुदेव सेवा मंडळ स्वयंसेवक, विशाल आत्राम, उपसरपंच सुनील जिड्डेवार, सामाजिक कार्यकर्ता मारोतराव कान्हारकर, राम कृष्ण बावणेवा,गौरव लडी,नरेश अक्कलवार व समस्त गावकरी सावंगी पेरका यांनी केली आहे

            

पुरुष गट कार्यशक्ती बक्षीस प्रवेश फी 500 रुपये

प्रथम बक्षीस 13000, द्वितीय बक्षीस 11000, तृतीय बक्षीस 10000, चतुर्थ बक्षीस 9000, पंचम बक्षीस 8501, सहावे बक्षीस 7000, सातवे बक्षीस 6000, आठवे बक्षिस 5000, नवे बक्षीस 4000, दहावे बक्षीस 3000

महिला गट आकर्षक बक्षीस प्रवेश फी 400/रु

पहिले बक्षीस 8000, दुसरे बक्षीस 6500, तिसरे बक्षीस 5000, चौथे बक्षीस 4000, पाचवे बक्षीस 3000, सहावे बक्षीस 2000